By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 09:43 IST
1 / 15सोशल मीडिया साईट फेसबुकच्या युझर्सचा डेटा लिक झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं होतं. 2 / 15यावेळी केवळ युझर्सच नाही, तर Facebook चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांचा डेटाही लिक झाल्याची माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे. यातून एक मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. 3 / 15मीडिया रिपोर्ट्सुसार मार्क झुकेरबर्ग हे WhatsApp नाही तर त्यांचं प्रतिस्पर्धी अॅप Signal चा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. 4 / 15समोर आलेल्या माहितीनुसार फेसबुक युझर्सचा जो डेटा लिक झाला आहे. त्यात झुकेरबर्ग यांचाही मोबाईल क्रमांक होता. 5 / 15५३ कोटींपेक्षा अधिक फेसबुक युझर्सचा खासगी डेटा यावेळी लिक झाला आहे. यामध्ये तब्बल ६० लाख भारतीय युझर्सचाही समावेश आहे. 6 / 15डेटा लिकमध्ये युझर्सचा आयडी, मोबाईल क्रमांक, ईमेल, स्थान, जन्मतारीख आणि मॅरिटल स्टेटसचा समावेश आहे. 7 / 15फेसबुकच्या या डेटा लिकमध्ये मार्क झुकरबर्ग यांचा नंबरही लिक झाला आहे, ज्यामुळे ते कोणतं मॅसेजिंग अॅप वापरताच हे समोर आलं आहे. 8 / 15एका सुरक्षा संशोधकाने खुलासा केला आहे की झुकरबर्ग त्याच्या लिक झालेल्या नंबरसह 'सिग्नल' या अॅपचा वापर करतात. 9 / 15सुरक्षा तज्ज्ञ डेव्ह वॉकर यांनी ट्विटर मार्क झुकरबर्ग यांच्या लिक झालेला नंबर स्क्रिनशॉटद्वारे दाखवला आहे. 10 / 15यात त्यांनी झुकेरबर्ग हे 'सिग्नल'वर असल्याचंही म्हटलं आहे. या डेटा लिकमध्ये फेसबुकचे सह-संस्थापक Chris Hughes आणि Dustin Moskovitz यांची माहितीही सामील आहे. 11 / 15झुकेरबर्ग यांच्यासोबत या दोघांचादेखील डेटा लिक झाला आहे. रिपोर्टनुसार हा डेटा २०२० मध्ये लिक झाला होता. 12 / 15फेसबुकमधील एका बगमुळे फेसबुक अकाऊंट्ससोबत युझर्सचे मोबाईल क्रमांकही दिसत होते. फेसबुकनं हा बग ऑगस्ट २०१९ मध्ये ठीक केल्याचंही सांगितलं होतं. 13 / 15फेसबुकमधील एका बगमुळे फेसबुक अकाऊंट्ससोबत युझर्सचे मोबाईल क्रमांकही दिसत होते. फेसबुकनं हा बग ऑगस्ट २०१९ मध्ये ठीक केल्याचंही सांगितलं होतं. 14 / 15काही दिवसांपूर्वी WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीवरूनही वाद झाला होता. त्यानंतर नवी प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट करण्याची मर्यादा वाढवण्यात आली होती. 15 / 15नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा युझर्सच्या चॅट किंवा प्रोफाईल डेटाशी काहीही घेणंदेणं नाही असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. WhatsApp च्या एन्ड टू एन्ड इनक्रिप्शन पॉलिसीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही आणि युझर्सचं चॅट सुरक्षित राहिल असंही कंपनीनं म्हटलं होतं.