शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : WhatsApp, TikTok ला मागे टाकत 'हे' अ‍ॅप ठरलं नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 15:33 IST

1 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे. 
2 / 14
WhatsApp, TikTok ला मागे टाकत लॉकडाऊनदरम्यान 'झूम' हे अ‍ॅप नंबर वन ठरलं आहे.
3 / 14
भारतात 5 कोटींहून अधिक वेळा झूम अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे.
4 / 14
लॉकडाऊनमुळे ऑफिसच्या मीटिंगसाठी अनेकजण व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप असलेल्या Zoom चा वापर करत आहेत.
5 / 14
सध्या हे अ‍ॅप भारतात प्ले स्टोरच्या फ्री सेक्शनमध्ये नंबर वन अ‍ॅप बनले आहे. 
6 / 14
झूम एक फ्री एचडी मीटिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवरून युजर एकाचवेळी जास्तीत जास्त 100 लोकांसोबत बोलू शकतो. 
7 / 14
झूम अ‍ॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे सोपे युजर इंटरफेस आहे. तसेच या अ‍ॅपमध्ये युजर्सना अनेक फीचर देण्यात आले आहेत.
8 / 14
झूमच्या फ्री व्हर्जनमधील कॉलमध्ये एकाचवेळी 100 लोक जोडले जाऊ शकतात.
9 / 14
अ‍ॅपमध्ये वन-टू-वन मीटिंग आणि 40 मिनिटांची ग्रुप मीटिंग कॉलिंगची सुविधा आहे. 
10 / 14
प्रोफेशनल शिवाय युजर्स या अ‍ॅपचा वापर हा पर्सनल कॉलसाठी देखील करीत आहेत.
11 / 14
सध्या झूम अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
12 / 14
सोशल डिस्टिंग राखण्यासाठी झूम अ‍ॅप हा उत्तम पर्याय आहे. यामुळे अनेकांशी पटकन कनेक्ट होता येतं.
13 / 14
काही दिवसांपूर्वी झूम अ‍ॅप वादात सापडले होते. मदरबोर्डच्या एका रिपोर्टमध्ये आयओएस व्हर्जन युजर्सचा डेटा फेसबुकपर्यंत पोहोचला जात आहे. हे अ‍ॅप ओपन केल्यानंतर युजर्सला टाईम झोन आणि शहराची माहिती फेसबुकला दिली जाते असं म्हटलं होतं.
14 / 14
ही बातमी लीक झाल्यानंतर कंपनी वादात अडकली होती. त्यानंतर कंपनीने तो कोड डिलिट केला. यानंतर आता लॉकडाऊन दरम्यान झूठ अ‍ॅप नंबर वन ठरले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडियाtechnologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपTik Tok Appटिक-टॉक