Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp ओपन न करता कोण, कधी ऑनलाईन आहे हे असं जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:42 IST
1 / 17कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान घरबसल्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. 2 / 17लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपचा वापर केला जात असून व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अगदी सहज एकमेकांशी कनेक्ट होता येतं. 3 / 17व्हॉट्सअॅपवर अनेकदा एखाद्या व्यक्तीला मेसेज केल्यावर ती व्यक्ती प्रत्येकवेळी ऑनलाईन असेलच असे नाही. तर कधी आपण ऑनलाईन नसतो. 4 / 17व्हॉट्सअॅप ओपन न करता अनेकदा कोण आणि कधी ऑनलाईन आहे हे पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते. अशाच युजर्सना व्हॉट्सअॅपवर हे पाहण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे.5 / 17व्हॉट्सअॅपवर ट्रिक्सच्या माध्यमातून एखादी व्यक्ती कधी ऑनलाईन येते याबाबत माहिती मिळते. पण अनेकांना हे माहीत नाही. कसं पाहायचं हे जाणून घेऊया. 6 / 17आपल्याला हवा असलेला कॉन्टॅक्ट नंबर जेव्हा ऑनलाईन येईल तेव्हा एक नोटिफिकेशन पाठवलं जाईल.7 / 17व्हॉट्सअॅप ओपन न करता कोण ऑनलाईन हवं ते पाहण्यासाठी सर्वप्रथम GBWhatsApp हे अॅप डाऊनलोड करा.8 / 17साधारण व्हॉट्सअॅपपेक्षा हे अॅप जास्त अॅडव्हान्सवालं फीचर अॅप आहे.9 / 17हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी गुगलवर GB Whatsapp APK असं सर्च करा. 10 / 17GBWhatsApp अॅप डाऊनलोड केल्यानंतर सेटिंगमध्ये जा.11 / 17सेटिंगमध्ये देण्यात आलेल्या Main/Chat screen या पर्यायावर क्लिक करा.12 / 17Contact Online Toast हा पर्याय निवडा.13 / 17 त्यानंतर Show contact online toast हे क्लिक करा.14 / 17तुम्ही निवडलेला कॉन्टॅक्ट नंबर जेव्हा ऑनलाईन येईल तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवलं जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.15 / 17घरात बसून राहावे लागत असल्याने अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी WhatsApp वर कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे.16 / 17WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार आहे. युजर्सना 'लॉकडाऊन स्पेशल' स्टिकर्स पाठवता येणार असून यासाठी व्हॉट्सअॅपने खास स्टिकर पॅक आणला आहे.17 / 17व्हॉट्सअॅपने ‘Together at Home' चे स्टिकर पॅक लाँच केलं आहे. यासाठी कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेसोबत हात मिळवणी केली आहे.