शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:50 IST

1 / 8
व्हॉट्सअ‍ॅप वापरर्त्यांसाठी केंद्र सरकारने इशारा दिला आहे. अॅप अपडेट केले नाही तर वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात येऊ शकतो. केंद्राच्या सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In हा इशारा दिला.
2 / 8
WhatsApp च्या iOS आणि macOS व्हर्जनमध्ये एक गंभीर त्रुटी आढळून आली आहे. ही त्रुटी लिंक्ड डिव्हाइस हँडलिंगशी संबंधित आहे, असं CERT-In ने म्हटले आहे.
3 / 8
अहवालानुसार, जर एखादा हल्लेखोर या कमकुवतपणाचा फायदा घेत असेल तर तो वापरकर्त्यांना बनावट लिंक्सवर क्लिक करायला लावून त्यांच्या खाजगी चॅट्स आणि संवेदनशील डेटामध्ये प्रवेश करू शकतो.
4 / 8
२.२५.२१.७३ पेक्षा जुन्या iOS WhatsApp व्हर्जनसाठी, २.२५.२१.७८ पेक्षा जुन्या iOS व्हर्जनसाठी WhatsApp Business, २.२५.२१.७८ पेक्षा जुन्या Mac व्हर्जनसाठी WhatsApp या व्हर्जनना धोका जास्त आहे.
5 / 8
या वापरकर्त्यांना सर्वाधिक धोका असतो. CERT-In ने सर्व वापरकर्त्यांना त्यांचे अॅप तात्काळ व्हर्जन अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
6 / 8
हे धोकादायक आहे. पण जर ती दुसऱ्या Apple बग (CVE-2025-43300) सोबत वापरली गेली तर हल्लेखोर आणखी शक्तिशाली होऊ शकतात. याचा अर्थ हॅकर्सना वापरकर्त्यांचा डेटा चोरण्याचे अनेक मार्ग मिळतात, असे CERT-In ने म्हटले आहे.
7 / 8
व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हर्जन अपडेट करा. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा. अॅप पूर्णपणे अपडेट होईपर्यंत अज्ञात संदेश किंवा URL उघडू नका. सध्या, व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. कंपनी सहसा सुरक्षेशी संबंधित समस्या लवकर दूर करते.
8 / 8
व्हॉट्सअॅप हे भारतातील कोट्यवधी वापरकर्त्यांचे आवडते मेसेजिंग अॅप आहे. या सुरक्षा त्रुटीचा वापरकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. सरकारच्या इशाऱ्याला हलक्यात घेऊ नका. अॅप लगेच अपडेट करा, अन्यथा तुमचे चॅट आणि वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMetaमेटा