शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्मार्टफोन घेताय?; तर १५ हजारांपेक्षा कमी किंमतीचे 'हे' ठरू शकतात बेस्ट ऑप्शन्स

By जयदीप दाभोळकर | Published: February 20, 2021 2:03 PM

1 / 10
सध्या 4G आणि 5G स्मार्टफोन्सकडे सर्वांचा कल असतो. तंत्रज्ञान बदलतं तसं आपणही अनेकदा नव्या स्मार्टफोन्सकडे आकर्षित होत असतो. बाजारात वाढत असलेल्या स्पर्धेमुळे स्मार्टफोन्सच्या किंमतीही कमी होत चालल्या आहेत.
2 / 10
जर तुम्हाला एखादा नवा स्मार्टफोन घ्यायचाय किंवा आणखी एक स्मार्टफोन वापरायचा असेल आणि तुमचं बजेट कमी असेल, तर खाली दिलेले स्मार्टफोन्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स ठरू शकतात. तर पाहूया १५ हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीचे काही स्मार्टफोन्स.
3 / 10
Poco M3 ची भारतात किंमत 10999 रूपये इतकी आगे. हा स्मार्टफोन 6 GB रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येतो. यामध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून यात 48 मेगापिक्सेलचा ट्रिपल सेटअम कॅमेराही आहे.
4 / 10
Redmi Note 9 ची भारतातील किंमत 11,999 रूपयांपासून सुरू होते. 15000 रुपयांच्या आत येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 5,020 mAh ची बॅटरी देण्यात आली असून 22.5W फास्ट चार्जिंगही देण्यात आलंय. या स्मार्टफोनमध्ये 6.53-inch चा FHD+डिस्प्लेही मिळतो.
5 / 10
भारत या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होते. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमरा सेटअप, मोठा डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरीसह येतो.
6 / 10
Realme Narzo 20 Pro ची किंमत भारतात 14,999 रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोन मध्ये 65W फास्ट चार्जिंगच्या सुविधेसह 4,500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनचा डिस्प्ले 6.5-inch चा असून तो Full HD+ IPS LCD सोबत येतो. याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे.
7 / 10
14,999 रूपयांना मिळणारा 15 हजार रूपयांच्या आत येणार हा सर्वात चांगला स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.5-inch Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. यामध्ये 30W फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे.
8 / 10
Samsung Galaxy M21 ची भारतात किंमत 13,999 रूपयांपासून सुरू होतीय यामध्ये 6.4-inch Full HD+ Infinity-U डिस्प्ले देण्यात येतो. या फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळतो. तसंच यात 6,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये Exynos 9611 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.
9 / 10
या स्मार्टफोनची किंमत 12,999 रूपयांपासून सुरू होते. यामध्ये 48 quad-camera सेटअप देण्यात आलं आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये Mediatek Helio P35 हा प्रोसेसर देण्यात आला आहे.
10 / 10
Poco M2 Pro हा स्मार्टफोन 13,999 रूपयांना मिळतो. यामध्ये 6.67-inch Full HD+ LCD देण्यात आला आहे. यामध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली असून तो 33W फास्ट चार्जिंगही सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 720G SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनsamsungसॅमसंगxiaomiशाओमीrealmeरियलमीMobileमोबाइल