शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टोरेज फुल झाल्यामुळे स्लो झालाय फोन? हे 6 अ‍ॅप्स एका क्लीकमध्ये करतील मदत

By सिद्धेश जाधव | Published: December 09, 2021 6:31 PM

1 / 6
हे गुगलच अधिकृत अँड्रॉइड फाईल मॅनेजर अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप मोफत डाउनलोड करता येतं. आणि यातील क्लीन टॅबमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या फोनमधील अनावश्यक फाईल्स उडवू शकता. हे अ‍ॅप तुम्हाला वाया जाणारी स्टोरेज दाखवून देतं. ज्यात जंक फाईल्स, डुप्लिकेट फाईल्स, बॅकअप केलेले फोटो आणि न वापरलेल्या अ‍ॅप्सचा समावेश असतो.
2 / 6
Droid Optimizer एक प्रसिद्ध अँड्रॉइड क्लिनर अ‍ॅप आहे, लाखो युजर्स याचा वापर करतात. हे अ‍ॅप वापरण्यास सोपं आहे. यात तुम्ही तुमचं क्लीनअप शेड्युल देखील करू शकता, म्हणजे ठरविक वेळेवर रोज फोन क्लीन होईल.
3 / 6
विंडोजवरील प्रसिद्ध अ‍ॅप अँड्रॉइडवर देखील उपलब्ध आहे. हे अ‍ॅप तुमची स्टोरेज अ‍ॅनलाईज करून तुम्हाला स्पेस मिळवून देण्यास मदत करतं. याचा वापर करून कॅशे फाईल्स, रिकामे फोल्डर आणि विविध अ‍ॅप्सची हिस्टरी डिलीट करता येते.
4 / 6
हे अ‍ॅप फक्त अनावश्यक फाईल्स डिलीट करत नाही तर बॅटरी हेल्थ आणि सिपियू टेम्परेचरवर लक्ष ठेवतं. तसेच स्मार्टफोनवरील धोकादायक अ‍ॅड्सवर देखील याचं लक्ष असतं.
5 / 6
SD Maid च्या मदतीनं अनइन्स्टॉल केलेल्या अ‍ॅप्सच्या फाईल्स शोधून डिलीट करता येतात. तसेच यातील अ‍ॅप क्लीनरच्या मदतीनं बरीच स्पेस रिकव्हर करता येते.
6 / 6
Norton Clean सोप्प्या पद्धतीनं अन्य अ‍ॅप्स प्रमाणे अँड्रॉइड फोनमधील कॅशे, अनावश्यक फाईल्स डिलीट करतो. यात एक क्लीन युआय देण्यात आला आहे. हे एक फ्री अ‍ॅप आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही मोठ्या प्रमाणावर स्पेस रिक्लेम करू शकता.
टॅग्स :Androidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान