Gmail चे ५ भन्नाट फीचर्च, काही मिनिटांत होतील सर्व कामे; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:33 IST
1 / 6 जगभरात Gmail चे करोडो युजर आहेत. Gmail आता फक्त Email पाठवण्यासाठी आणि वाचण्यासाठी राहिलेले नाही, तर ते एक स्मार्ट टूल बनले आहे. याद्वारे काम सोपे आणि अतिशय जलद करता येते. बऱ्याचदा आपण Gmail फक्त मेल तपासण्यासाठी वापरतो, पम त्यात असे अनेक फीचर्स आहेत, जे आपली प्रोडक्टिव्हिटी अनेक पटींनी वाढवू शकतात. आम्ही तुम्हाला जीमेलच्या अशा ५ उत्तम फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमचे काम काही मिनिटांत पूर्ण होईल.2 / 6शेड्यूल सेंड-बऱ्याचदा आपल्याला ईमेल तात्काळ पाठवण्याऐवजी विशिष्ट वेळी पाठवावे लागतात. जीमेलमध्ये दिलेल्या शेड्यूल सेंड फीचरच्या मदतीने, तुम्ही ईमेल नियोजित तारखेला आणि वेळेला पाठवू शकता. ज्यांना तात्काळ मेल पाठवायचा नाही, त्यांच्यासाठी हे फिचर उपयुक्त आहे.3 / 6स्मार्ट कंपोझ-तुम्हाला लांब ईमेल लिहिण्याचा कंटाळा आला असेल, तर स्मार्ट कंपोझ तुमच्या कामाचे आहे. फीचर तुमची लेखन शैली समजून आपोआप सूचना देते. तुम्ही काही शब्द टाइप करताच संपूर्ण ओळ दिसते. हे वेळ वाचवते आणि ईमेल लिहिणे खूप सोपे करते.4 / 6कॉन्फिडेन्शिअल मोड-तुम्हाला संवेदनशील किंवा खाजगी दस्तऐवज पाठवायचे असेल, तर जीमेलचा कॉन्फिडेन्शिअल मोडखूप उपयुक्त आहे. यामध्ये, तुम्ही मेलसाठी एक एक्सपायरी डेट सेट करू शकता. रिसीव्हर ईमेल फॉरवर्ड, कॉपी किंवा डाउनलोड करू शकत नाही.5 / 6ऑफलाइन मोड-कधीकधी इंटरनेट समस्यांमुळे मेल वाचणे किंवा पाठवणे कठीण होते. जीमेलचा ऑफलाइन मोड हा या समस्येवर उपाय आहे. इंटरनेट नसले तरीही तुम्ही मेल वाचू शकता आणि उत्तरे टाइप करू शकता. तुमचे डिव्हाइस ऑनलाइन होताच, सर्व मेल आपोआप पाठवले जातील.6 / 6फिल्टर आणि लेबल्स-तुम्हाला तुमच्या जीमेल इनबॉक्समध्ये दररोज बरेच मेल येत असतील आणि ते शोधणे कठीण होत असेल, तर तुम्ही फिल्टर आणि लेबल्स फीचर वापरू शकता.