शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 1:55 PM

1 / 6
आपल्या चिमुकल्याला कर्तव्यावर हजर असताना स्तनपान करत असलेल्या एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेचं नाव सिथोंग असून ती कंबोडियातील पोलिस कर्मचारी आहे. ही महिला कर्तव्यावर उपस्थित असताना आपल्या भुकेलेल्या बाळाला दूध पाजत होती.
2 / 6
या पोलिस कर्मचाऱ्याच्या वरीष्ठांनी सार्वजनिक स्वरूपात आपली चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली आहे. सध्या या घटनेनं सोशल मीडियवावर धुमाकुळ घातला आहे.
3 / 6
रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार सिनियर अधिकारी सिथोंग सोखा यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. सिथोंग सोखा यांनी सांगितले की, कंबोडियातील महिला आणि पोलिस फोर्सच्या प्रतिष्ठेला बदनाम केलं आहे. त्यानंतर महिला मंत्रायलाकडून सिथोंग सोखा यांच्यासह गैरव्यवहार केल्याप्रकरणी आवाज उठवला आहे.
4 / 6
महिला मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकारी महिलेनं दिलेल्या माहितीनुसार सिथोंग सोखा यांच्याशी गैरव्यवहार केल्यामुळे ते खूप निराश असून खरं तर सिथोंग सोखा यांचे कौतुक व्हायला हवे.
5 / 6
मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर लोकांना आकर्षित करण्यासाठी या महिलेनं आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
6 / 6
विविध संघटनांनी याबाबत आवाज उठवायला सुरूवात केली आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसWomenमहिला