तुमचा पतीही इतर महिलांचे फोटो लाईक्स करतोय?; तुर्की कोर्टानं सुनावलेला 'हा' निकाल एकदा वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:19 IST
1 / 10धावपळीच्या या जगात सोशल मीडिया प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. परंतु यामुळे नात्यांमध्ये नवी आव्हाने उभी राहिल्याचे समोर आले आहे. तुर्कीत असेच एक प्रकरण समोर आले आहे जिथे कोर्टाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. तुर्कीच्या सिव्हिल कोर्टाने मानले की, जर एखादा पती सोशल मीडियावर सातत्याने दुसऱ्या महिलांचे फोटो लाईक्स करत असेल तर त्याची वर्तवणूक नात्यातील विश्वासर्हता कमी करण्यासारखी आहे.2 / 10कोर्टाने म्हटलं, अशाप्रकारे ऑनलाईन एक्टिव्हिटी पार्टनरच्या भावनांना दुखावू शकते आणि वैवाहिक संबंधांमध्ये कटुता आणखी वाढू शकते. हा निर्णय केवळ जोडप्यांसाठी मर्यादित नाही तर येणाऱ्या काळात होणाऱ्या लग्नाशी निगडित वादांवरही महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं कोर्टाने स्पष्ट केले.3 / 10कोर्टात या वादावेळी महिलेने सांगितले की, माझा पती कायम दुसऱ्या महिलांचे फोटो पाहतो आणि त्याला लाईक्स करतो. ज्यामुळे मला अपमानित आणि असुरक्षित वाटते. त्याच्या या वागण्याने नात्यातील विश्वास उडाला आहे. त्यामुळे घरातील वातावरणही खराब झाल्याचा आरोप तिने केला.4 / 10त्याशिवाय पतीच्या या वर्तवणुकीमुळे या दोघांमधील वैवाहिक नाते धोक्यात आले आहे असं तिने याचिकेत म्हटलं. म्हणून या महिलेने ५ हजार लीरा(१०,५८५ रूपये) पोटगी आणि ५० लाखाहून अधिक लीरा(१ कोटी ५८ लाख) भरपाई देण्याची मागणी केली आहे.5 / 10या खटल्यात सुनावणी करताना कोर्टाने पतीला दोषी धरले आहे. कोर्टात पतीची वागणूक गंभीर चुकीची असून त्याला नुकसान भरपाई म्हणून ४०००० लीरा नुकसान भरपाई आणि ७५० लीरा दरमहिन्याला पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. 6 / 10कोर्टाने या सुनावणीत म्हटलं की, एखाद्या फोटोला लाईक्स करणे थेट विश्वासघात करणे नाही परंतु मात्र त्यामुळे पार्टनरला मानसिक त्रास होऊ शकतो आणि वैवाहिक नात्यातील विश्वास कमकुवत होतो असं सांगितले. 7 / 10विवाहित पुरुषांनी या गोष्टीवर लक्ष ठेवा - सोशल मीडियावर काही पोस्ट लाईक अथवा कमेंट करण्यापूर्वी त्याचा तुमच्या पार्टनरवर काय परिणाम होत असेल त्याचा विचार करावा. कुणाला फॉलो अथवा लाईक करायचे अथवा कुणापासून अंतर ठेवायचे हे ठरवायला हवे. 8 / 10जर पार्टनरला एखादी गोष्ट असुरक्षित वाटत असेल तर ते सहज घेऊ नका. उघडपणे बोलल्याने भरवसा आणखी वाढू शकतो. खासगी अथवा इमोशनल गोष्टी सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी विचार करावा. त्याचा नात्यावर काय परिणाम होईल हे पाहावे. 9 / 10जुन्या नाते अथवा मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त ऑनलाईन संपर्क राहू नये. उगाच त्यातून गैरसमज वाढता. सोशल मीडियावर राग व्यक्त करणे नात्यात तणाव निर्माण करू शकते. त्यामुळे शांत राहणे चांगले आहे. फोनवर अधिक वेळ घालवण्यापेक्षा पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवा. 10 / 10जुन्या नाते अथवा मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त ऑनलाईन संपर्क राहू नये. उगाच त्यातून गैरसमज वाढता. सोशल मीडियावर राग व्यक्त करणे नात्यात तणाव निर्माण करू शकते. त्यामुळे शांत राहणे चांगले आहे. फोनवर अधिक वेळ घालवण्यापेक्षा पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवा.