"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:05 IST
1 / 8सध्या सोशल मिडिया आणि गुगलवर पायल गेमिंग हे नाव प्रचंड ट्रेंड होत आहे. एक खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो याच तरुणीचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.2 / 8पायलने यावर स्पष्ट म्हटले आहे, 'इंटरनेरवर चर्चा पाहून मी या विषयावर बोलते आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर जो व्हिडिओ आणि फोटो फिरतायत त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. त्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मी नाही.'3 / 8पायल गेमिंग म्हणजेच पायल धारे हिने यासंबंधी आपली बाजू मांडली आहे. असाच काहीसा प्रकार 'कच्चा बदाम' फेम अभिनेत्री अंजली अरोरासोबत झाला होता. त्याचा परिणाम तिला अजूनही भोगावा लागतोय असे तिने सांगितले.4 / 8अंजली अरोराने लिहिले, 'तीन वर्षांपूर्वी माझ्या नावाने एक बनावट MMS व्हायरल झाल्यामुळे मला मानसिक आघाताला सामोरे जावे लागले होते. आज पायल गेमिंगसोबत तेच घडताना पाहून, त्या वेदनादायक आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.'5 / 8'लोकांना त्यांच्या कृती किती हानिकारक आहेत याची जाणीव नसते. त्यांच्यासाठी तो काही मिनिटांचा मनोरंजनाचा खेळ असतो - पण आमच्यासाठी तो अनेक वर्षांचा मानसिक आघात बनतो आणि त्याचा दीर्घकाळ परिणाम होतो.'6 / 8'अशा खोट्या वादामुळे मला चांगल्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले. आजही मला प्रोफेशनल क्षेत्रात वाईट परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्याचे कारण माझे काम नसून, त्यावेळी कुणीतरी केलेला खोटेपणा कारणीभूत आहे.'7 / 8'आताही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मला सतत शिवीगाळ केली जाते, लोक घाणेरडी भाषा वापरतात. अश्लील प्रश्न विचारतात, मला अपमानास्पद नावांनी हाक मारतात आणि परिणामाचा एक क्षणही विचार न करता मला ट्रोल करतात.'8 / 8'खोट्या गोष्टींवर हल्ली खूपच सहजपणे विश्वास ठेवला जातो. सहानुभूतीची गरज असताना लोक आपल्यालाच जज करू लागतात, हे त्रासदायक आहे. ही मानसिकता घृणास्पद असून कुठल्याही महिलेला खोटारडेपणाचा त्रास सहन करायला लागू नये', असे अंजलीने लिहिले.