Coronavirus: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण? जाणून घ्या सत्य! सरकारनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 21:35 IST
1 / 9देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजारांवर पोहचला आहे तर १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 2 / 9कोरोनाच्या संकटकाळात सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. अनेक जुने व्हिडीओ, फोटो व्हायरल केले जात आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबद्दलही एक अफवा पसरली आहे.3 / 9अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री असून विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास मानले जातात. मोदींच्या प्रत्येक संकटावेळी अमित शहा उभे राहिलेले पाहायला मिळतात. 4 / 9कोरोनाचं संकट देशावर उभं राहिलं असताना यामध्ये कुठेही अमित शहा दिसत नाहीत. अमित शहा गेले कुठे असं वारंवार प्रश्न केला जात आहे. 5 / 9गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हिंदी चॅनेलवरील हेडलाईनमध्ये अमित शहा कोरोनाच्या चपेटमध्ये आल्याचं सांगितलं आहे. हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.6 / 9या फोटोबाबत खुद्ध सरकारच्या पीआयबी विभागाला खुलासा करावा लागला आहे. या फोटोबाबत ट्विट करुन पीआयबीने लोकांना सत्य सांगितले आहे.7 / 9पीआयबीच्या फॅक्ट चेकवर याबाबत ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये हिंदी चॅनेलच्या नावाने मॉर्फ केलेला फोटो व्हायरल झाला त्यात अमित शहांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 8 / 9मात्र हा फोटो खोटा असून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी व्हायरल केला जात असल्याचं पीआयबीने सांगितले आहे. तसेच हा फोटो फॉरवर्ड करु नका असं आवाहनही केलं आहे.9 / 9दरम्यान अमित शहा हे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या निवासस्थानी दिवे पेटवताना दिसले होते.