By प्रविण मरगळे | Updated: January 5, 2021 13:06 IST
1 / 10कोविशिल्ड या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची लस भारतात कोरोना विषाणूविरूद्ध वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशा स्थितीत लसीची दीर्घ प्रतीक्षा संपली असून आता लवकरच लसीकरण प्रक्रिया सुरू केली जाईल. 2 / 10या सर्वांमध्ये भारतातील व्हॅक्सिन मॅन अदार पूनावालाची पत्नी नताशा पूनावाला चर्चेचा विषय ठरली आहे. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, ती कोण आहे? ती काय करते? लोकांना अनेक प्रश्न जाणून घ्यायचे आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया3 / 10वास्तविक, नताशाची असे अनेक फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये ती बॉलिवूड स्टार्ससोबत दिसली आहे. पण नताशा बॉलिवूड सेलिब्रिटी नसली तरी तिची लोकप्रियता कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाही. 4 / 10ती भारतातील नामवंत व्यक्तींपैकी एक आहे. नताशाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.5 / 10त्याचबरोबर, ती आपले पती अदार पूनावाला यांना त्यांच्या व्यवसायातील व्यवहारांमध्येही सल्ला देते. इतकेच नाही तर ती तिच्या फॅशन स्टेटमेंट्सबाबतही चर्चेत आहे. नताशाचे पती अदार यांनी शालेय शिक्षण लंडनमधील वेस्टमिंस्टर विद्यापीठात केले होते 6 / 10याचठिकाणी दोघं एकमेकांना पहिल्यांदा भेटले. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट केले आणि काही काळानंतर आपल्या कुटूंबाच्या संमतीने २००६ मध्ये लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. 7 / 10या दोघांनी महाराष्ट्रातील पुणे येथे मोठ्या उत्साहात लग्न केले होते, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, विजय मल्ल्या आणि बॉलिवूडमधील अनेक नामांकित चेहरे सहभागी झाले होते. 8 / 10बॉलिवूडपासून फॅशन इंडस्ट्रीपर्यंत नताशाची मैत्री आहे. मलायका अरोरा, करण जोहर, करीना कपूर खान, मनीष मल्होत्रा यांच्यासह नताशाचे बरेच मोठे सेलेब्रिटी चांगले मित्र आहेत.9 / 10अदार हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत, तर त्यांची पत्नी संचालक आहेत. या संस्थेने कोरोना विषाणूवर मात देण्यासाठी एक लस विकसित केली आहे. ती विकसित करण्यासाठी नताशानेही नवरा अदारला साथ दिली आहे. 10 / 10नताशा आपल्या पतीसह पुण्यात राहते, पण त्यांचा मुंबईत बंगलासुद्धा आहे. नताशा अनेकदा करिश्मा, करीना, सोनम, मलायका आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत आढळते, त्यामुळे बॉलीवूडशी त्यांचे खूप जवळचे नाते असल्याचं म्हटले जाऊ शकतं.