ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
साताऱ्यात धुक्याची दुलई, नागरिकांना आल्हाददायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 12:00 IST
1 / 5सात डोंगरांनी वेढलेल्या साताऱ्यात आजची सकाळ स्वर्ग सुख देणारी ठरली. 2 / 5यवतेश्वर, अजिंक्यतारा या दोन डोंगराच्या मधोमध असलेल्या शहराचे अस्तित्वच धुक्यात हरवून गेले होते. 3 / 5या धुक्यामुळे रस्त्यावरून गाडी चालवणंही अवघड झालं होतं. 4 / 5 साक्षात पृथ्वीवरच स्वर्ग अवतरल्याचा भास होत होता. महाबळेश्वरला असे दृश्य बऱ्याचदा पाहायला मिळते, 5 / 5पण आता साताऱ्यातही हे दृश्य पहायला मिळाल्याने सातारकर आणि पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले आहे.