1 / 10मराठी नाटक गाजवणारी तसेच चित्रपट आणि मालिका गाजवणारी कलाकार म्हणजे भक्ती बर्वे. पु.ल देशपांडे यांच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. 2 / 10नयनतारांनी अनेक नाटके गाजवली. नंतर मराठी चित्रपटांमध्येही बऱ्याच भूमिका केल्या. बनवाबनवी मधली म्हातारी या नावाचे त्या ओळखल्या जाऊ लागल्या. 3 / 10किल्ला सारखा चित्रपट करणारी अमृता सुभाष नाटकामध्ये काम करण्याला प्राधान्य देते. गंभीर भूमिका अगदीच सहज साकारण्याची कला तिला अवगत आहे. 4 / 10मुक्ता बर्वे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक अशी कलाकार आहे जी सर्व प्रकारच्या भूमिका उत्कृष्टपणे करू शकते. चित्रपट आणि नाटक दोन्ही इंडस्ट्रींमध्ये तिचा जम बसला आहे.5 / 10प्रिया बापट चित्रपटांमुळे जरी प्रसिद्ध झाली असली तरी नाटकप्रेमी तिला तिच्या नाटकांमधील भूमिकांसाठीच ओळखतात. ती फार नाटक सिनेमे करत नाही. मात्र जे करते त्यामध्ये भूमिका छान साकारते.6 / 10 वर्षा उसगांवकरने अनेक चित्रपट केले त्याचप्रमाणे अनेक नाटकांमध्येही काम केले. अजूनही करते. काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले.7 / 10सुकन्या कुलकर्णी-मोने चित्रपटांमध्ये छाप सोडतेच मात्र एकेकाळी नाटकक्षेत्रामध्ये त्यांचे नाव फलकावर असायचेच. विनोदी, गंभीर कोणतीही भूमिका असो त्या लोकांना आवडतातच. 8 / 10कविता लाड-मेढेकर जास्त चित्रपटांमध्ये किंवा नाटकांमध्येही दिसत नाही मात्र जेवढ्यांमध्ये काम केले तेवढ्या सगळ्या भूमिका प्रसिद्ध झाल्या. प्रशांत दामले आणि कविता ही नाटक गाजवणारी जोडी श्रोत्यांच्या हृदयात आहे. 9 / 10रोहिणी हट्टंगडी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारतात. मात्र त्यांची चार चौघी नाटकातील भूमिका फार गाजली. त्यांनी याआधीही अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे.10 / 10पर्ण पेठे चित्रपटांमध्ये फार कमी दिसते. मात्र अनेक नाटकांमध्ये काम करताना पर्ण दिसते. नवीन पिढीतील नाटक क्षेत्रातील उभरती कलाकार म्हणून तिच्याकडे बघितले जाते.