1 / 7चॉकलेट आईस्क्रीम, चॉकलेट केक, चॉकलेट फज, हॉट चॉकलेट अशा वेगवेगळ्या चॉकलेटच्या पदार्थांचे काही सेलिब्रिटी पक्के चाहते आहेत. हे पदार्थ खाल्ल्याशिवाय त्यांची ट्रीट पूर्ण होतच नाही. त्या यादीत नेमके कोणकोणते स्टार येतात ते पाहा...2 / 7सगळ्यात पहिलं नाव घ्यावं लागेल दीपिका पादुकोनचं. हॉट चॉकलेट हा तिचा अतिशय आवडीचा पदार्थ आणि ती ते कधीही पिऊ शकते म्हणे... 3 / 7दीपिकाला जसं हॉट चॉकलेट आवडतं, तसंच तिचा नवरा रणवीर सिंग हा देखील चॉकलेटचा शौकिन आहे. चॉकलेट नटेला त्याला खूप आवडतं, असं त्याने मागेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. 4 / 7ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनाही चॉकलेट खायला खूप आवडतं. रोज जेवण झाल्यानंतर डार्क चॉकलेटचे एक- दोन तुकडे खाल्ल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.5 / 7करीना कपूर खान ही देखील चॉकलेट खाण्याच्या बाबतीत पुढे आहे. चॉकलेटचा केक तिच्या विशेष आवडीचा.6 / 7शिल्पा शेट्टीला चॉकलेट फज खायला आवडतं. चॉकलेट फज खातानाचे तिचे बरेच फोटो व्हायरलही झालेले आहेत.7 / 7तर कतरीनाला चॉकलेट आईस्क्रीम खायला खूप आवडतं. एरवी खाण्यापिण्याच्या बाबतीत तिचं बरंच पथ्यपाणी असलं तरी चॉकलेट आईस्क्रिमसमोर मात्र ती सगळं विसरून जाते.