शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आंबे खाल्ल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगतं? 'हे' काम करा आणि मगच आंबे खा- त्रास होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2025 14:55 IST

1 / 6
उत्साहाच्या भरात आपण आंबे खातो. पण बऱ्याच जणांना मात्र त्यानंतर त्रास होतो.
2 / 6
पोट जड पडून गुबारल्यासारखं होतं. गॅसेसचा त्रास होतो. काही जणांचं तर बारीक पोट दुखतं.. हा त्रास टाळायचा असेल तर आंबे खाण्यापुर्वी एक काम अगदी न विसरता करायलाच हवं.. ते कोणतं ते पाहूया..
3 / 6
आहारतज्ज्ञ सांगतात ज्यांची पित्त प्रकृती असते त्यांना आंबे खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणे, ॲसिडीटी वाढणे असा त्रास होतो. तो त्रास टाळण्यासाठी आंबे खाण्यापुर्वी अर्धा तास पाण्यात भिजत घाला आणि नंतरच ते खा. कारण यामुळे आंब्यामधली उष्णता कमी होते.
4 / 6
ज्यांना ॲक्ने, पिंपल्स असा त्रास असतो, त्या व्यक्तींनीही आधी आंबे पाण्यात भिजत घालावे आणि नंतरच ते खावे. कारण आंब्यातल्या उष्णतेेमुळे त्यांचा पिंपल्स, ॲक्नेचा त्रास आणखी वाढू शकतो.
5 / 6
आंबे जर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले तर त्याच्यात असणाऱ्या फायटिक ॲसिडचं प्रमाण कमी होतं. यामुळे आंब्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा लाभ अधिक चांगल्या पद्धतीने शरीराला मिळतो.
6 / 6
आंब्यावर फवारलेली औषधं किंवा त्याच्यावर बसलेले जंतू निघून जाण्यासाठीही आंबे भिजत घालण्याची सवय चांगली आहे..
टॅग्स :foodअन्नMangoआंबाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स