1 / 10हल्ली तिशी ओलांडली की, महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या कामाचा ताण, थकवा आणि इतर अनेक गोष्टींचा आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे हा़डे ठिसूळ होतात. (Foods for strong bones and menstrual pain relief)2 / 10वाढत्या वयानुसार आपण आपल्या आहारात अनेक सुपरफूडचा समावेश करायला हवा. ज्यामुळे आपले आरोग्य सुधारेल. तसेच उतारवयात आपल्याला अधिक ताण सहन करावा लागणार नाही. विशेषत: महिलांनी कोणता आहार घ्यायला हवा पाहूया. (Best foods to eat for bone health and cramps)3 / 10शरीरातील रक्ताची कमी असेल, हृदयाचे आरोग्य सुधारवायचे असेल आणि हा़डं मजबूत करायचे असतील तर काळे मनुके रोज खायला हवे. ज्यामुळे अनेक समस्यांपासून सुटका असेल. 4 / 10रोज सकाळी आवळा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होते. तसेच केसांची वाढ होण्यास मदत होईल.5 / 10जर आपल्याला थायरॉइड आणि प्रजननक्षमतेचा त्रास असेल तर आहारात अक्रोड खायला हवे. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. 6 / 10कॅल्शियमयुक्त असणारे तीळ रोज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. तसेच मासिक पाळीत वेदना होत असतील तर तीळ खायला हवे. 7 / 10मेथी दाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 8 / 10नाचणीमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन आणि खनिजांचे प्रमाण जास्त असते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम देखील असते त्यामुळे स्त्रियांनी याचे पदार्थ खा. 9 / 10डाळिंबामध्ये असणारे घटक रक्ताची कमतरता भरून काढते. त्वचा निरोगी ठेवते. पचनसंस्था सुधारुन प्रजनन क्षमता वाढवते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. 10 / 10आपली स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्याची असेल तर रोज सकाळी बदाम खायला हवे.