काळ्या केसांसाठी कशाला महागड्या मेलॅनिनच्या गोळ्या खाता? ‘हे’ पदार्थ खा, म्हातारपणीही केस काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 15:59 IST2026-04-13T15:55:59+5:302026-04-13T15:59:36+5:30

कमी वयात केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर तुमच्या आहारात पुढे सांगितलेले काही पदार्थ असायलाच हवेत. कारण या पदार्थांमुळे शरीरातलं मेलॅनिन वाढतं आणि त्याचा फायदा केसांना होतो. केस काळे राहण्यास मदत होते.

त्यापैकी पहिला पदार्थ आहे काळे तीळ. कारण त्यांच्यामध्ये असणारं कॉपर शरीरात मेलॅनिन वाढविण्यासाठी मदत करतं. त्यामुळे दररोज १ चमचा काळे तीळ खायलाच हवेत.

फ्री रॅडिकल्समुळे केसांची मुळं खराब होतात आणि केस पांढरे व्हायला सुरुवात होते. पण आवळ्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स ही क्रिया रोखण्यास मदत करतं आणि त्यामुळे केस काळे राहण्यास मदत होेते.

केस काळे राहण्यासाठी पालकही खूप उपयुक्त ठरतं. पालकामध्ये लोह, फोलेट जास्त प्रमाणात असतं. ते केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं.

केस पांढरे होऊ नयेत म्हणून अक्रोडही नियमितपणे खायला हवे. कारण त्यात असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. ही माहिती डॉक्टरांनी drnehakhuraana.md या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.