शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोणता सुकामेवा केव्हा खावा आणि कसा खावा? वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला, वाटेल तेव्हा खाणं धोक्याचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 14:44 IST

1 / 9
सुकामेवा हा आरोग्यदायीच असतो. पण म्हणून तो इच्छा झाल्यास कधीही आणि केव्हाही खात असाल तर थांबा. आणि काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता हे सगळे पदार्थ कधी आणि कशा पद्धतीने खावेत ते पाहा..(the correct way of eating nuts, seeds and dry fruits for getting maximum nutrition from them)
2 / 9
रात्रभर पाण्यात भिजवलेले एक ते दोन अक्रोड रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये खाल्ले पाहिजेत. १- २ अक्रोड खाणे पुरेसे ठरते.
3 / 9
एका प्रौढ व्यक्तीने दररोज ४ ते ६ बदाम खाणे उपयुक्त ठरू शकते. हे बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी त्याची सालं काढून ते खावेत. रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास ते जास्त फायदेशीर ठरतात.
4 / 9
चिया सीड्स पाण्यात किंवा दुधात २० ते ३० मिनिटे भिजवून खावेत. यासाठी एक टेबलस्पून चिया सीड्स असेल तर अर्धा कप पाणी किंवा दूध घ्यावे. रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या आधी चिया सीड्स खाणे चांगले.
5 / 9
जवस हे नेहमी चटणीच्या स्वरूपात खावे, असं म्हटलं जातं. त्यामुळे ते पचायला सोपे होतात. किंवा १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजवलेले जवस खाणेही फायदेशीर ठरते.
6 / 9
भोपळ्याच्या बिया कच्च्या किंवा हलक्याशा भाजूनही खाऊ शकता. सलाडमध्ये घालूनही त्या खाल्ल्या तरी चालतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा मग जेवणाच्या आधी त्या खाव्यात.
7 / 9
काजू कच्चे किंवा हलकेसे भाजून खावेत. सकाळच्या वेळेस किंवा दुपारचं जेवण आणि रात्रीचे जेवण यांच्यामध्येही तुम्ही ४ ते ५ काजू खाऊ शकता.
8 / 9
सूर्यफुलाच्या बिया कच्च्या किंवा मोड आणून किंवा हलक्याशा भाजून खाल्ल्या तरी चालतात. सलाड, स्मूदी यामध्येही त्या घेऊ शकता. नाश्त्यामध्ये किंवा स्नॅक्स टाईमला खायला त्या चांगल्या आहेत.
9 / 9
दर दिवशी १० ते १५ पिस्ता तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. ही माहिती तज्ज्ञांनी yogabhilasha या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सfoodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स