साडी जुनी असो की नवी साधी! कॉलर पॅटर्न ब्लाऊज म्हणजे ग्लॅमरस लूक ; पाहा ८ कॉलर ब्लाऊज डिझाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 21:00 IST2026-04-13T21:00:00+5:302026-04-13T21:00:02+5:30
Chinese collar vs stand collar blouse: Blouse neck designs for broad shoulders: Backless collar blouse design ideas: आपण या लग्नसराईत गर्दीत वेगळे आणि ग्लॅमरस दिसायचे असेल, तर जुन्या डिझाईन्स सोडून हे लेटेस्ट ८ कॉलर पॅटर्न नक्की ट्राय करा.

लग्न सीझन असो किंवा खास कौटुंबिक सोहळा.. साडी नेसल्यावर अनेकांच्या नजरा आपल्या ब्लाऊजच्या डिझाइनवर असतात. साध्या गळ्याच्या ब्लाऊजची फॅशन जुनी झाली असून कॉलर ब्लाऊज प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत. साडी कितीही महागडी असली, तरी जोपर्यंत त्यावरचा ब्लाऊज स्टायलिश नसतो, तोपर्यंत तो लूक पूर्ण होत नाही. कॉलर ब्लाऊज आपल्याला प्रोफेशनल आणि 'रॉयल' लूक देत नाहीत, तर ते आपल्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास भरतो.(Chinese collar vs stand collar blouse)

साध्या सुती साडीपासून ते भरजरी पैठणीपर्यंत, प्रत्येक साडीवर कॉलर ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न उठून दिसतात. जर आपण या लग्नसराईत गर्दीत वेगळे आणि ग्लॅमरस दिसायचे असेल, तर जुन्या डिझाईन्स सोडून हे लेटेस्ट ८ कॉलर पॅटर्न नक्की ट्राय करा.(Blouse neck designs for broad shoulders)

हाय नेक चिनी कॉलर हे डिझाईन सर्वात जास्त लोकप्रिय आहे. यामुळे आपला संपूर्ण गळा झाकला जातो आणि आपल्याला उंच व नीटनेटका लूक मिळतो. सिल्क किंवा कॉटन साड्यांवर हे अतिशय सुंदर दिसते.

पीटर पॅन कॉलर ब्लाऊजमध्ये आपल्याला क्युट आणि व्हिंटेज लूक देतो. यामध्ये कॉलरचे कोपरे गोल असतात, जे फ्रॉक किंवा टॉपसारखे दिसतात.

आपल्याला इंडो -वेस्टर्न लूक हवा असेल तर शर्ट स्टाइल कॉलर ब्लाऊज शिवू शकतो. हे आपण ऑफिस पार्टी किंवा फॉर्मल इव्हेंट्ससाठी बेस्ट आहेत.

ब्लेझर किंवा कोटसारखी कॉलर असलेले ब्लाऊज अतिशय बोल्ड आणि आधुनिक दिसतात. नेटच्या साड्यांवर हा प्रकार खूप छान खुलून दिसतो.

स्टँड कॉलर विथ की-होल ब्लाऊजमध्ये कॉलर स्टँड असते, पण गळ्याच्या खाली छोटासा होल किंवा कट असतो. यामुळे लूक जास्त बंदिस्त वाटत नाही आणि गळ्यात छोटा हार देखील घालता येतो.

ज्यांना गळ्याभोवती मऊ आणि रुंद कॉलर हवी असते, त्यांच्यासाठी शाल कॉलर डिझाईन योग्य आहे. ही कॉलर व्ही-नेक आकारासारखी असते.

पुढून बंद कॉलर आणि पाठीमागून 'डीप कट' किंवा बॅकलेस, हे युनिक डिझाइन सध्या सेलिब्रिटींमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

साध्या ब्लाऊजला हेवी लूक द्यायचा असेल, तर कॉलरवर जरदोसी किंवा मण्यांचे काम करू शकतो. यामुळे आपल्याला दागिन्यांचीही गरज भासणार नाही.

















