शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Social Viral : बाबौ! रात्री गर्लफ्रेंडनं मागितला बॉयफ्रेंडचा ट्रॅक सूट; पॉकेटमध्ये हात घालताच धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 15:51 IST

1 / 7
प्रेमात पार्टनरकडून दगा मिळाल्यानंतर काहीजण नैराश्यात जातात तर काहींना जगण्याची इच्छाच नसते. . ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेनं रिलेशनशिप पोर्टलवर तिचा अनुभव शेअर केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून महिला सांगते की पती तिला धोका देत असल्याची गोष्ट कशी समोर आली.
2 / 7
लौरी नावाच्या महिलेलनं लिहिलं की, 'मी रात्रीच्यावेळेस माझ्या बॉयफ्रेंडची ट्रॅकसुट मागितला. मला त्याची पॅण्ट घालून बाहेर जायचं होतं. जेव्हा मी ट्रॅक पॅण्टच्या खिशात हात टाकला तेव्हा मला कंडोमचं पॅकेट मिळालं. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. माझा बॉयफ्रेड मला धोका देत असल्याचं लक्षात आलं.' लौरीनं या व्हिडीओमध्ये कंडोमचं पाकीटसु्द्धा दाखवलं आहे.
3 / 7
यानंतर लौरीनं आपला कॅमरा बॉयफ्रेंडकडे फिरवला. या व्हिडीओत तो बेडवर झोपलेला दिसून आला. लोरीनं विचारलं, मी त्याला उठवून त्याच्याशी आत्ताच बोलायला हवं की नंतर? या व्हिडीओला ७७०,००० पेक्षा जास्त लाईक्स आणि ३०० पेक्षा जास्त कमेंट्स मिळाल्या आहेत.
4 / 7
काहीवेळातच लौरीनं दुसरा व्हिडीओ पोस्ट करत सांगितले की, ''मी आतापर्यंत त्याला काहीच विचारलेलं नाही. मला या घटनेला अजून इंटरेस्टिंग बनवायचं आहे. मुलींनो मला सांगा मी काय करायला हवं.''
5 / 7
लौरीनं प्रश्न विचारताच तिला उत्तर देणाऱ्यांची रांगच लागली. लोकांनी तिला एकापेक्षा एक उपाय सांगितले. लौरीच्या या व्हिडीओवर एका युजरनं,तुम्ही नवीन वर्षाची वाट पाहा. लंचला जा त्याला बील भरू द्या नंतर त्याला गिफ्ट म्हणून हे कंडोमचं पाकीट द्या. असा सल्ला दिला.
6 / 7
तर एका महिलेनं पतीच्या हातावर ते कंडोमचं पाकीट ठेवायला सांगितलं. त्यानंतर त्याची ट्रॅक जिथे होती तिथे ठेवून निघून जा असं सांगितलं.
7 / 7
पुन्हा एक व्हिडीओ पोस्ट करत लौरीनं खुलासा केला की, माझा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका महिलेनं मला इंस्टाग्रामवर मेसेज केला. माझा बॉयफ्रेंड तिच्या मैत्रिणीच्या मागे असल्याचं तिनं सांगितलं. या व्हिडीओच्या माध्यामातून मला या प्रकरणाच्या तळाशी जाण्यास मदत मिळाली.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाrelationshipरिलेशनशिप