By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:33 IST
1 / 10चंद्रकोर मंगळसूत्र (Chandrakor Mangalsutra) हे पारंपारीक मराठी दागिन्यांमधील एक अत्यंत मोहक आणि लोकप्रिय डिझाईन आहे. स्त्रियांमध्ये या डिझाईनची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. (Trending Chandrakor Mangalsutra For Shiv Jayanti)2 / 10चंद्रकोर डिझाईन पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जातात. चंद्रकोर दागिन्यांमध्ये असेल तर एक सुंदर मराळमोळा लूक मिळतो.3 / 10यात सोन्याच्या पेंडंटचा आकार अर्धचंद्राकृती असतो. यावर बारीक नक्षीकाम, कुंदन वर्क केलेले असते.4 / 10सध्या मार्केटमध्ये ठुशी स्टाईल चंद्रकोर, मणी गुंफण आणि डिझायनर चेन अशा विविध स्वरूपात हे मंगळसूत्र उपलब्ध आहे.5 / 10अधिक शोभिवंत दिसण्यासाठी चंद्रकोरीच्या मध्यभागी किंवा कडेला लाल किंवा हिरवे पाचू वापरले जातात. 6 / 10चंद्रकोरीच्या खाली लटकणारे पांढरे टपोरे मोती या दागिन्याला एक राजेशाही आणि क्लासिक लूक देतात.7 / 10साधी चंद्रकोर ऑफिस किवा रोजच्या वापरासाठी उत्तम दिसते. तर जड नक्षीकाम केलेली चंद्रकोर लग्न समारंभासाठी साडीवर खुलून दिसते.8 / 10 काही डिझाईन्समध्ये चंद्रकोरीवर लक्ष्मीची मूर्ती किंवा कमळाची फुलं कोरलेली असतात. जे टेम्पल ज्वेलरीचा फिल देतात.9 / 10हे डिझाईन्स कधीही जुनं होते नाही. अधुनिक काळात मंगळसुत्राच्या लांब सरीसोबत किंवा अगदी आखूड नाजूक चेनमध्येही चंद्रकोर वापरली जाते.10 / 10नऊवारी किंवा काठापदराच्या साडीवर या प्रकारचे मंगळसूत्र खूपच उठून दिसतात.