1 / 7शिल्पा शेट्टी तिच्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून नेहमीच व्यायामाचे, योग्य आहाराचे महत्त्व पटवून देत असते.(shilpa shetty explains benefits of eating ghee)2 / 7तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असून तो desikhanadesivlog या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 3 / 7यामध्ये शिल्पा असं सांगत आहे की आजकालच्या तरुण मुली तुपाचा खूप जास्त बाऊ करतात. पण असं करू नका. कारण तूप हे अतिशय आरोग्यदायी आहे.4 / 7शिल्पा म्हणते की ती दररोज ब्राऊन राईससोबत जवळपास एक ते दिड चमचा एवढं तूप खातेच.. त्यामुळे तूप तुमच्या तब्येतीसाठी गरजेचं आहे. ते खाणं टाळू नका, असं तिने स्पष्टपणे सांगितलं आहे.5 / 7तूपामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत तूप खाणे आरोग्यासाठी चांगलेच आहे.6 / 7शिवाय तुपामध्ये व्हिटॅमिन ई असल्याने तूप सौंदर्यवर्धक आहे. 7 / 7रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठीही तूप खाणे फायदेशीर ठरते.