1 / 11मला पाणीपुरी खायला आवडत नाही. असं म्हणणारं नेमकच कोणीतरी असू शकतं. कारण पाणीपुरी चिजही ऐसी है!! 2 / 11भारतामध्ये स्ट्रीट फुड प्रचंड आवडीने खाल्ले जाते. त्यामध्ये चाट हा अत्यंत लोकप्रिय असा प्रकार आहे. अजून एक अजून एक म्हणत म्हणत भरपूर पुऱ्या खाल्या जातात.3 / 11पण सगळीकडे पाणीपुरी तयार करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते. पाणीपुरीला विविध नावे ही आहेत.4 / 11बंगाल मध्ये आणि इतरही काही ठिकाणी पाणीपुरीला पुचका म्हटले जाते. आकारही जरा वेगळा आसतो. तसेच रगडा नाही तर बटाटा वापरला जातो.5 / 11दिल्ली सारख्या ठिकाणी पाणीपुरीला गोलगप्पा असे म्हटले जाते. टम्म गोल असते म्हणून मग गोल गप्पा. 6 / 11दिल्ली सारख्या ठिकाणी पाणीपुरीला गोलगप्पा असे म्हटले जाते. टम्म गोल असते म्हणून मग गोल गप्पा. 7 / 11ओडीसा आणि काही इतर ठिकाणी पाणीपुरीला गुपचूप म्हटले जाते. खाताना तोंड भरून जाते म्हणून बोलता येत नाही. मग नाव गुपचूप असे पडले. 8 / 11राजस्थान, उत्तर प्रदेश आदी काही ठिकाणी पानी के पताशे किंवा पताशी असे म्हटले जाते. 9 / 11काही ठिकाणी पाणीपुरीला पडका असे म्हटले जाते.10 / 11नेपाळमधील काही ठिकाणी फुलकी असे म्हणण्याची पद्धत आहे. तसेच उत्तर प्रदेशमधीलही काही जण फुलकी शब्द वापरतात. 11 / 11मध्यप्रदेशामधील काही भागांमध्ये पाणीपुरीला टिक्की म्हटले जाते. खरं तर टिक्की हा वेगळा पदार्थ आहे. पण पाणीपुरीला टिक्की म्हणणारे लोकही आहेत. या पुऱ्या आकाराला लहान असतात.