शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Navratri 2025 : आजचा रंग पांढरा, जगण्यात शीतल सुखाची झुळूक, पाहा पांढऱ्या रंगाचे ७ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 18:47 IST

1 / 9
नवरात्रीचे नऊ रंग सगळ्यांनाच माहिती असतात. त्या दिवशी त्या रंगाचे कपडे घालून कामाला जाताना किंवा कॉलेजला जाताना मजा तर वाटतेच. मात्र फक्त त्या रंगाचे कपडेच नाही तर त्या रंगाचे पदार्थही करुन खायला मजा येईल.
2 / 9
नवरात्रीच्या दिवसांची मजा आणखी वाढवण्यासाठी कलर कोड फॉलो करताना तो खाण्याच्या पदार्थांतही करा. त्या दिवशी खास त्याच रंगाचा पदार्थ करण्यासाठी रेसिपी पाहा. पहिला दिवस म्हणजे पांढरा रंग. पांढऱ्या रंगाचे हे ७ खास पदार्थ.
3 / 9
दह्यातली कोशिंबीर करायला सोपी आणि रंगालाही पांढरी असते. फोडणी न देता करायची. म्हणजे रंग बदलत नाही. तसेच पौष्टिकही असते.
4 / 9
पांढरा पुलाव सगळेच आवडीने खातात. विविध आवडत्या भाज्या त्यात घाला आणि मस्त चविष्ट असा पुलाव तयार करा. डब्यासाठीही एकदम मस्त पदार्थ आहे.
5 / 9
उपासाला चालणारी रेसिपी म्हणजे दह्यातला बटाटा. ही रेसिपी एकदम सोपी आहे तसेच उपासाला चालते. बटाटे मस्त परतायचे आणि नंतर दह्यात मिक्स करायचे. त्याला हिरव्या मिरचीची फोडणी द्यायची.
6 / 9
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खीर हा पदार्थ आवडतो. भरपूर सुकामेवा घालून ताज्या दुधाची खीर प्रसादासाठी उत्तम असते.
7 / 9
महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला पांढराशुभ्र पदार्थ म्हणजे खरवस. गोडाचा पदार्थ म्हणून खरवस एकदम मस्त पर्याय आहे.
8 / 9
साऊथ स्पेशल इडलीही रंगाला पांढरीच. अगदी मऊ आणि चविष्ट असते. तसेच आंबवल्यावर आणि वाफवून केल्यामुळे पौष्टिकही असते. भारतात नाश्त्यासाठी इडली जागोजागी खाल्ली जाते.
9 / 9
कढी अनेक प्रकारे करता येते. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे पांढरी कढी. ही कढी करताना त्यात हळद घातली जात नाही. त्यामुळे रंग वेगळा येतो. चव मात्र एकदम मस्त असते.
टॅग्स :Navratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५Fasting & Foodनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Social Viralसोशल व्हायरल