शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

९० टक्के लोक 'इथे' चुकतात, म्हणूनच तर केस गळून पातळ होतात, बघा तुम्हीही तेच करता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2024 09:05 IST

1 / 9
हल्ली असं झालं आहे की बहुतांश लोकांचे केस खूप गळत आहेत. पुरेसा आहार घेऊन, केसांसाठी योग्य कॉस्मेटिक्स वापरूनही केस म्हणावे तसे वाढत नाहीत. उलट आणखीनच गळतात.
2 / 9
याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बहुतांश लोक केसांच्या बाबतीत काही चूका वारंवार करतात. त्याचा केसांवर परिणाम होत जातो आणि मग केस गळून गळून खूपच पातळ होतात. अकाली पांढरे दिसू लागतात. त्या चुका कोणत्या ते पाहा..
3 / 9
केसांचं ट्रिमिंग नियमितपणे न करणे. यामुळे केसांना फाटे फुटून ते कोरडे, रुक्ष होतात.
4 / 9
नेहमीच गरम पाण्याने केस धुणे. केस धुण्यासाठी नेहमी थंड, कोमट पाणी वापरावं.
5 / 9
ओले केस खूप खसाखस पुसणे आणि जोर लावून विंचरणे.
6 / 9
नेहमीच केस खूप घट्ट बांधून ठेवणे.
7 / 9
केसांसाठी चुकीचे कॉस्मेटिक्स आणि कंगवा वापरणे. सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला न घेता वारंवार कॉस्मेटिक्स बदलत राहणे.
8 / 9
वारंवार केस धुणे तसेच शाम्पू केल्यानंतर कंडिशनरचा वापर न करणे.
9 / 9
आहाराकडे दुर्लक्ष करणे. केसांसाठी पोषक असणारे पदार्थ आहारातून न घेणे.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडी