शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तेल मीठ मिरची वापरुन करा ५ भाज्या, डब्यासाठी झटपट चविष्ट भाज्या- नको मसाले नी वाटणघाटण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 19:32 IST

1 / 9
आपण भाजी तयार करताना त्यामध्ये कांदा, टोमॅटो घालतो. काही भाज्यांना वाटण लावतो. तसेच विविध मसाले भाजी तयार करताना वापरतो.
2 / 9
भाजीमध्ये दाण्याचे कुट घालून भाजी छान परतली जाते. ओलं खोबरं घालून बऱ्याच भाज्या तयार केल्या जातात. चिंच घातली जाते. आमसुल घातले जाते. गूळ वापरला जातो. काही जण भाजीमध्ये साखरही टाकतात.
3 / 9
पण अशाही काही भाज्या आहेत ज्यांची चव मुळातच फार छान असते. त्यामध्ये कोणतेही जास्तीचे पदार्थ घालण्याची आवश्यकता नसते. फक्त तिखट व मीठ घालून तेलावर किंवा तुपावर भाजी परतायची.
4 / 9
अशा भाजा चवीला फार छान लागतात. तयार करणे फारच सोपे असते. तसेच घाईगडबड असताना अशाच भाज्या वापरा वेळही वाचतो.
5 / 9
१. फरसबीची भाजी विविध प्रकारे तयार केली जाते. मात्र साध्या तेलावर परतूनही ही भाजी छान लागते. मस्त पैकी मीठ आणि तिखट घालायचे. हवे असल्यास फोडणी तयार करायची.
6 / 9
२.लहान मुलांची आवडती भाजी म्हणजे भेंडी. भेंडी छान परतून खुप कुरकुरीत करता येते. फार स्क्रीस्पी होते. मीठ आणि तिखट घालायचे. वाटल्यास कडीपत्याची फोडणी द्या.
7 / 9
३. गवारीचे बारीक तुकडे करून ते नुसते परतले आणि मीठ तिखट लावले की मस्त लागतात. भाताबरोबर खाण्यासाठी अगदीच मस्त लागतात.
8 / 9
४. रात्रभर भिजवलेली मटकी सकाळी छान परतून अगदी कुरकुरीत करता येते. मटकीची शक्यतो उसळच केली जाते. मात्र अशी परतलेली मटकी फार चविष्ट लागते.
9 / 9
५. बटाट्याच्या काचऱ्या तर सगळ्यांनाच आवडतात. त्याही नुसत्या तेल तिखटावर परतल्या तरी छान लागतात. छान कुरकुरीत करता येतात.
टॅग्स :vegetableभाज्याfoodअन्नRecipeपाककृती