शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

किडनी स्टोनचा त्रास? 'ही' चूक कराल तर कॅल्शियम कमी होऊन हाडं ठिसूळ होतील, तज्ज्ञ सांगतात.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2025 19:10 IST

1 / 6
किडनी स्टोनचा त्रास बऱ्याच जणांना होतो. हा त्रास असणारे बरेचसे लोक एक चूक प्रामुख्याने करतात आणि त्यामुळे मग शरीरातले कॅल्शियम कमी होते.
2 / 6
शरीरातलं कॅल्शियम कमी झालं की मग हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे मग किडनी स्टोनच्या त्रासासोबतच हाडांचं दुखणंही मागे लागतं. हा त्रास टाळायचा असेल तर आहारातल्या काही चुका प्रामुख्याने टाळायला हव्या, अशी माहिती आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.
3 / 6
त्या सांगतात की हा किडनी स्टोनचा त्रास हा प्रामुख्याने शरीरातलं कॅल्शियम ऑक्झालेट वाढल्यामुळे होतो. त्यामुळे कॅल्शियम असणारे पदार्थ अनेक जण कमी प्रमाणात खातात. पण हे चुकीचं आहे.
4 / 6
आपल्याला फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की शरीरात कॅल्शियम ऑक्झालेट हे संयुग तयार होऊ द्यायचं नाही. त्यासाठी आपण कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ले तरी चालतात पण ज्या पदार्थांमध्ये ऑक्झालेट असतं असे पदार्थ खाणं टाळायला हवं.
5 / 6
ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया.. त्यापैकी पहिला पदार्थ आहे टोमॅटो. टोमॅटो खाणं टाळायला हवं.
6 / 6
किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी टोमॅटोसोबतच पालक खाणंही टाळायला हवं. कारण पालकामध्येही ऑक्झालेट भरपूर प्रमाणात असतं.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स