1 / 8मलायका अरोरा ही एक नावाजलेली अभिनेत्री व डान्सर आहे. मलायका तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. पन्नाशी झाली तरी ती सुंदर आणि फीट आहे. 2 / 8२०१८ मध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी मिडियावर त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले. तेव्हापासूनच ही जोडी कायम चर्चेत होती. गेल्याच वर्षी त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.3 / 8मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी असल्याने त्यांचे नाते सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल झाले होते. मलायका व अरबाज खानच्या घटस्फोटावेळीही मलायका फार ट्रोल झाली होती. 4 / 8मात्र सध्या चर्चेत आहे मलायकाची एक इंस्टाग्राम स्टोरी. ज्यावर तिने काही अशा वाक्यांचा वापर केला आहे, ज्यामुळे अर्जुन कपूरचे वागणे कसे होते? हा प्रश्न लोकांना पडला आहे.5 / 8मलायकाने लिहीले होते की, वय वाढले की आरडाओरडा नको वाटतो. शांतता हवीहवीशी वाटते. अपमाना सहन करण्यापेक्षा नात्यामध्ये अंतर असलेले कधीही चांगले. ड्रामा नको वाटायला लागला आहे. ड्राम्यापेक्षा शांत जीवन व्यतीत करण्याला प्राधान्य द्यावे असे मलायका वाटते. 6 / 8मलायकाला आता आजूबाजूला तिची जवळीच माणसं हवी आहेत. ज्या माणसांमुळे तिला मानसिक त्रास होईल अशी लोक आयुष्यात नको असे मलायका म्हणते. ज्यांच्यामुळे स्वास्थ्य खराब होईल असे लोक आयुष्यात नका ठेऊ असे ही ती म्हणाली. 7 / 8मलायकाच्या या पोस्टनंतर ती प्रचंड चर्चेत आली. नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत तिला ट्रोलही केले आणि तिचे सांत्वनही केले. मलायका अजूनही तरुण मुलामुलींसारखा ड्रामा करते, असे काही जण म्हणाले तर काहींनी तिला स्ट्रॉग म्हटले.8 / 8ब्रेकअपनंतर अर्जुन कपुर व मलायका त्यांच्या नात्याबद्दल बोलताना कधी दिसले नाहीत. मात्र एका वर्षानंतर टाकलेली ही मलायकाची पोस्ट नक्की कोणासाठी होती? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.