शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

डाएटमध्ये करा ५ साधे- सोपे बदल, भराभर वजन कमी होईल- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2024 17:03 IST

1 / 7
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुमच्या आहारात पुढील बदल करून पाहा. यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया अधिक जलद होईल असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत.
2 / 7
भरभर वजन कमी होण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत, याची माहिती आहारतज्ज्ञांनी _artofwellness_ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
3 / 7
यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात मेथ्या आणि दालचिनी घालून केलेल्या चहाने करा. हा काढा प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी वाढते.
4 / 7
दुपारच्या जेवणापुर्वी लिंबूपाण्यात आल्याचा रस टाकून प्या. यामुळे तुम्ही जे खाल त्याचं व्यवस्थित पचन होण्यास मदत होईल.
5 / 7
जेवणापुर्वी तुम्ही जे सॅलेड खाता त्यावर लिंबाचा रस, मीठ आणि मिरेपूड टाकून खा. हे एक खूप चांगलं प्रोबायोटिक फूड मानलं जातं. यामुळे आतड्यांमध्ये पचनासाठी चांगले बॅक्टेरिया तयार होतात. तसेच ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते.
6 / 7
जेवणामध्ये भरपूर भाज्यांचा समावेश जरुर करा. यामुळे आहारातून वेगवेगळे पोषक घटक मिळतात.
7 / 7
जेवण झाल्यानंतर बडिशेप आणि ओवा घातलेला काढा प्या. यामुळे पचनक्रिया वाढते. त्यामुळे शरीरात चरबी साठून राहात नाही.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthy Diet Planआहार योजना