शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे रापलेल्या त्वचेला द्या राईस वॉटरचा थंडावा- बघा टॅनिंग कमी करण्याचा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 09:30 IST

1 / 5
उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून जाते. शिवाय उष्णतेमुळे किंवा वारंवार उन्हात गेल्याने त्वचेचा पोतदेखील खराब होतो.
2 / 5
म्हणूनच अशा काळवंडून गेलेल्या, उन्हामुळे रापलेल्या त्वचेला पुन्हा एकदा मऊ, मुलायम आणि चमकदार करण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...
3 / 5
हा उपाय करण्यासाठी आपण तांदळाच्या पाण्याचा एका खास पद्धतीने वापर करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर ते एक ते दिड तास पाण्यात तसेच भिजत ठेवा.
4 / 5
यानंतर तांदूळासकट पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी येऊ द्या. पाणी थोडं घट्ट होत आहे असं दिसलं की मग गॅस बंद करावा.
5 / 5
यानंतर ते पाणी थंड होऊ द्या. नंतर ते गाळून घ्या आणि आईस ट्रे मध्ये घालून त्याचा बर्फ करा. रोज रात्री झोपण्यापुर्वी किंवा उन्हातून आल्यानंतर हा राईस वॉटर आईस चेहऱ्यावरून फिरवा. त्वचेला छान वाटेल. त्वचा छान तुकतुकीत चमकदार होईल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीSummerउन्हाळा