शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

फक्त १० मिनिटांत कुकरमध्ये करा पावभाजी; हॉटेलसारखी मस्त चव येईल-४ पाव जास्त खाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:50 IST

1 / 7
कुकरमध्ये १० मिनिटांत पावभाजी करणं एकदम सोपं आहे. विशेषत: जेव्हा पाहूणे येणार असतात किंवा भूक लागलेली असते ८ ते १० लोकांसाठी सहज होते आणि वेळही वाचतो. (How To Make Pav Bhaji In Cooker)
2 / 7
बटाटे, फ्लॉवर आणि गाजर यांचे मध्यम ते बारीक तुकडे करा. तुकडे जेव्हढे लहान असतील तेव्हढे ते लवकर शिजतील आणि मॅश करायला बरं पडेल. (How To Make Pav Bhaji In Cooker in Easy Way)
3 / 7
कुकरमध्ये भाज्या शिजवताना थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. ज्यामुळे शिट्टी लवकर होईल आणि वेळ वाचेल.
4 / 7
हॉटेलसारखा लाल रंग हवा असेल तर कृत्रिम रंगाऐवजी बिटाचा एक छोटा तुकडा भाज्यांसोबत शिजायला टाका.
5 / 7
कुकरची वाफ गेल्यावर लगेच पोटॅटो मॅशरनं भाज्या कुकरमध्ये मॅश करून घ्या. भाज्या गरम असताना लगेच मॅश होतात.
6 / 7
भाज्या चिरण्यासाठी चॉपरचा वापर करा. एका बाजूला भाज्या शिजत असताना दुसऱ्या बाजूला पाव गरम करायला घ्या.
7 / 7
भाजी घट्ट वाटल्यास त्यात थोडं गरम पाणी घालून एक उकळी येऊ द्या. कधीही थंड पाणी वरून घालू नका. त्यामुळे चव बिघडते.
टॅग्स :Cooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्सfoodअन्न