शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात घरभर माशा-चिलटं? ५ रोपं घरात ठेवा, कुबट वास आणि कोंदटपणाही जातो चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 19:56 IST

1 / 7
पावसाळ्यात घरात माशा, चिलटं होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं. घरात कुठेही ओलसर, खरकटे पदार्थ राहिले तर त्याठिकाणी लगेचच माशा आणि चिलटं घोंगावू लागतात.
2 / 7
घरातल्या माशा आणि चिलटं कमी करायचे असतील तर घरात काही रोपं आणून ठेवा. यामुळे तुमच्या घरातल्या माशा आणि चिलटं तर जातीलच पण घरातला कोंदट वासही कमी होईल. याशिवाय रोपांमुळे तुमच्या घराला अधिक छान लूकही येईल.
3 / 7
पहिलं रोप आहे स्पायडर प्लांट. स्वयंपाक घरात डायनिंग टेबलवर, सिंकजवळ या दिवसांत खूप माशा होतात. त्याठिकाणी स्पायडर प्लांट ठेवलं तर माशा आणि चिलटांचं प्रमाण नक्कीच कमी होईल.
4 / 7
माशांना दूर पळवून लावणारं रोप म्हणजे पुदिना. भरपूर सुर्यप्रकाश जर घरातल्या एखाद्या खिडकीमध्ये येत असेल तर तिथे पुदिन्याची छोटीशी कुंडी आणून ठेवा.
5 / 7
अंगणात किंवा बाल्कनीमध्ये झेंडूचं रोप लावल्याने तिथे घोंगावणाऱ्या माशांचं प्रमाणही कमी होतं.
6 / 7
लवेंडर रोपाला नाजूक सुगंधी फुलं येतात. या फुलांच्या मंद सुगंधामुळे माशा आणि डास दूर पळतात. त्यामुळे घरातल्या माशा घालविण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो.
7 / 7
रोजमेरी या रोपाच्या आसपासही माशा फिरत नाहीत. त्यामुळे चांगला सुर्यप्रकाश येईल त्या ठिकाणी रोजमेरीची लहानशी कुंडी ठेवून पाहा. माशा दूर पळून जातील.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सHomeसुंदर गृहनियोजनPlantsइनडोअर प्लाण्ट्सmonsoonमोसमी पाऊस