शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फ्रिजमध्ये ठेवूनही आलं सुकून जातं? १ सोपी ट्रिक- आल्याचा सुगंध, ताजेपणा महिनाभर टिकून राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 13:44 IST

1 / 6
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे भाज्या, फळं लवकर सुकून जातात.
2 / 6
आल्याचंही तसंच आहे. या दिवसांत आधीच आलं खूप महाग असतं. आणि त्यातही ते लवकर सुकून जातं. वारंवार बाजारात जाऊन आलं विकत घेऊन येणंही शक्य नसतं.
3 / 6
म्हणूनच आता ही एक ट्रिक पाहा आणि आलं जास्तीतजास्त दिवस टिकवून ठेवा. हा उपाय केल्यामुळे आलं खूप दिवस तर फ्रेश राहीलच पण त्याचा सुगंधही टिकून राहील.
4 / 6
हा उपाय करण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या. त्यामध्ये चमचाभर मीठ घाला. या मिठाच्या पाण्यात १५ ते २० मिनिटांसाठी आलं भिजत ठेवा.
5 / 6
त्यानंतर ते पुसून स्वच्छ कोरडं करून घ्या. आल्याचा ओलेपणा पुर्णपणे कमी झाल्यानंतर ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवून द्या.
6 / 6
या पद्धतीने साठवून ठेवलेलं आलं खूप दिवस ताजं आणि सुगंधित राहील.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स