शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास वाढून पोटऱ्यांवर काळ्या- निळ्या रेषांचं जाळं? ५ उपाय- त्रास कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 14:53 IST

1 / 7
व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास हल्ली बऱ्याच जणांना कमी वयातच सुरू झालेला आहे. यामुळे पाय तर प्रचंड दुखतातच पण पोटऱ्यांवर, गुडघ्याच्या मागच्या बाजुला काळ्या- निळ्या रेषांचं जाळं वाढत जातं.
2 / 7
हा त्रास कमी करण्यासाठी नेमके काय उपाय करावे याविषयीची माहिती डॉक्टरांनी drharishgroverchiropractor या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
3 / 7
यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे विपरित करणी हे आसन करा. हे आसन केल्यानंतर तळपाय घोट्यापासून खाली- वर या पद्धतीने हलवा.
4 / 7
यानंतर सरळ ताठ उभे राहा. पायाच्या टाचा उचला आणि पुन्हा खाली ठेवा. असं साधारण १०० वेळा करा.
5 / 7
१० मिनिटांसाठी उलटे वॉकिंग करा. यामध्ये पुढे चालत जाण्याच्या ऐवजी मागे- मागे येत चालावे.
6 / 7
वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा जास्त त्रास जाणवायला लागतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवा.
7 / 7
गुडघ्यांच्यावर असतील असे स्टॉकिंग्ज घाला. रात्रीच्यावेळी गरम पाण्यामध्ये इप्सम सॉल्ट घालून त्यात काही वेळ पाय बुडवून ठेवा. हे उपाय करूनही जर आराम वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही त्यांनी सुचवलं आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHome remedyहोम रेमेडीExerciseव्यायामWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स