1 / 6डोसा करण्यापुर्वी आपण तव्याला तेल लावतो. तेल जास्त झालं की ते बऱ्याचदा तव्याच्या टोकाकडे जातं आणि तव्याच्या टोकाला गोलाकार साचून बसतं.(how to clean oil stains on dosa pan?)2 / 6त्यामुळे तव्याचा मधला भाग स्वच्छ दिसत असला तरी तव्याच्या कडा मात्र खूप तेलकट, चिकट होऊन जातात (how to clean oily dosa pan?). म्हणूनच या तव्याचा चिकटपणा काढून टाकायचा असेल तर तो कसा स्वच्छ करायचा ते पाहूया..(tips for cleaning oily dosa pan)3 / 6सगळ्यात आधी तर तेलकट झालेला तवा गॅसवर गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर तुमच्या घरातला कोणताही शाम्पू १ ते दिड चमचा एवढा टाका.4 / 6त्यामध्येच १ चमचा बेकिंग साेडा घाला. बेकिंग सोडा आणि शाम्पू एकत्रितपणे तव्याचा तेलकटपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.5 / 6आता त्यानंतर त्यावर १ ते दिड चमचा तुमच्या घरात असणारी कोणतीही टुथपेस्ट घाला. त्यावर थोडं गरम पाणी घाला आणि मऊ घासणीने तवा अलगदपणे घासून काढा.6 / 6यानंतर तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तव्याचा तेलकटपणा पुर्णपणे गेलेला असेल.