1 / 6गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सगळीकडे साजरा होत आहे. यानिमित्ताने महाराजांना जो नैवेद्य दाखविण्यात येत असतो तो खूपच वेगळा असतो.(Gajanan Maharaj Prakat din naivedya,)2 / 6त्यांच्या नैवेद्याच्या ताटात नेमके कोणते पदार्थ असतात ते आता पाहूया.. या नैवेद्यामध्ये सगळ्यात पहिला मान असतो तो बेसन म्हणजेच पिठल्याचा. त्यामुळे नैवेद्यासाठी स्वयंपाकाला सुरुवात करत असाल तर पिठल्यापासून नैवेद्याची सुरुवात करा.3 / 6त्यानंतर महाराजांच्या नैवेद्यातला दुसरा पदार्थ आहे भाकरी. ज्वारीची भाकरी केली तर अधिक उत्तम. 4 / 6गजानन महाराजांच्या नैवेद्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचाही अवश्य केला जातो. यादिवशी ठेच्याला विशेष मान आहे.5 / 6याशिवाय कच्चा कांदा देखील चिरून नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवला जातो. कच्चा कांदा ठेवण्याऐवजी काही जण पातीचा कोवळा कांदाही नैवेद्याच्या ताटात ठेवतात.6 / 6या नैवेद्यामध्ये एक गोड पदार्थही केला जातो आणि तो पदार्थ म्हणजे शिरा. साजूक तुपामध्ये केलेल्या शिऱ्याचा या दिवशी खास मान आहे. वर सांगितलेले सगळे पदार्थ एका स्वच्छ ताटामध्ये योग्य प्रमाणात वाढावे आणि ते ताट महाराजांच्या प्रतिमेसमोर ठेवून नैवेद्य दाखवावा.