1 / 8अभिनय क्षेत्रात उतरण्यापूर्वी फक्त अभिनय शिकणं पुरे होत नाही. अनेक पैलू असतात. ग्लॅमरच्या जगात उतरताना फक्त चेहरा ग्लॅमरस असून चालत नाही तर सगळ्याच गोष्टी परफेक्ट असायला हव्यात अशी कलाकारांची इच्छा असते. 2 / 8त्यामुळे अनेक अभिनेत्री काय आणि अभिनेते काय स्वतःचे खरे नावही बदलतात. ज्या नावाला लोक जास्त आकर्षित होतील आणि दिग्दर्शकाला आवडेल असे नाव शोधून स्टेजनेम ठेवले जाते. अनेक अभिनेत्रींना आपण ज्या नावे ओळखतो ती मुळात त्यांची नावे नाहीत. 3 / 8कियारा अडवाणी सध्या फार लोकप्रिय अशी एक अभिनेत्री आहे. मात्र तिचे खरे नाव आलिया असे असून तिने ते कियारा करुन घेतले. आलिया भट आधीच क्षेत्रात होती. तेच नाव पुन्हा नको म्हणून मी नाव बदलून घेतले असे कियाराने स्वत:हून सांगितले. 4 / 8रेखा एक अत्यंत नावाजलेली अभिनेत्री आहे. साऊथच्या राणीचे खरे नाव फक्त रेखा नाही तर भानुरेखा असे आहे. भानूरेखा गणेशन असे पूर्ण नाव असून रेखा हे नाव सोपे आहे म्हणून ती फक्त रेखाच लावते. 5 / 8अदा शर्माचे नावही अदा नसून चामुंडेश्वरी अय्यर असे आहे. लोकांनी तिला या नावाला कोणी काम देणार नाही असे म्हटल्यावर घाबरुन अदाने तरुण वयात नाव बदलून घेतले. मात्र तिला तिच्या नावाबद्दल आता अजिबात लाज नसल्याचे ती सांगते. 6 / 8मधुबालाचे नावही तिच्या एवढेच सुंदर वाटले तरी ते फक्त स्टेजनेम आहे. मधुबालाचे खरे नाव मुमताज देहलवी असे होते. चित्रपटात काम करण्यासाठी ते बदलून घेतले आणि मग मधुबाला या नावाने प्रचंड प्रेम मिळवले.7 / 8तब्बू एक गाजलेली आणि उत्कृष्ट अभिनय करणारी अभिनेत्री आहे. मात्र तिचे खरे नाव तब्बू नसून तबस्सुम फातिमा हाशमी असे आहे. त्यांना लाडाने तब्बू म्हटले जायचे पुढे तेच नाव प्रसिद्ध झाले. 8 / 8फिटनेसची राणी शिल्पा शेट्टीचे खरे नाव अश्विनी असे होते. वडीलांनी ठेवलेले हे नाव पुढे शिल्पाच्या आईच्या सांगण्यावरुन बदलण्यात आले. शिल्पा हे नाव पुढे तसेच राहीले घरचेही तिला शिल्पाच म्हणतात.