1 / 9१. क्योंकी सांस भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कुमकुम, कही तो होगा, कसौटी जिंदगी की... अशा एकापेक्षा एक हीट मालिका देणारी एकता कपूर देशभरातल्या महिलांना तासनतास टिव्हीसमोर खिळवून ठेवत होती... महिलाच काय पण अनेक घरातील पुरुषही तिच्या या मालिकांचे चाहते होते.. छोट्या पडद्यावरची 'k' क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली एकता आज तिचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. म्हणूनच तर तिच्या बाबतीतल्या या काही खास गोष्टी..2 / 9२. अभिनेते जितेंद्र यांची ही लेक. पण तरीही स्वत:ची ओळख आणि स्वत:चं काम तिला प्यारं होतं. म्हणूनच तर वयाच्या १५ व्या वर्षी ती काही जाहिराती, मालिका निर्मिती कंपनीमध्ये काम करायची. त्यानंतर १९९४ मध्ये वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने बालाजी टेलिफिल्म्स ही तिची स्वतंत्र निर्मिती कंपनी सुरु केली आणि तिथून मग पडोसन या मालिकेपासून तिचा प्रवास सुरु झाला... त्यानंतर हम पाँच आणि मग के सिरीजच्या मालिकांचा प्रवास तर अनेकांच्या लक्षात राहणाराच ठरला3 / 9३. सुरुवातीला अपयश तिलाही आलंच होतं.. टिका तिच्यावरही झालीच होती. पण स्वत:वर आणि स्वत:च्या कामावर तिचा प्रचंड विश्वास होता.. म्हणूनच तर expect the unexpected from me.... हा तिचा पॉझिटीव्ह ॲटीट्यूट अनेकांना प्रचंड आवडला.4 / 9४. आज एकता अतिशय स्लिम आणि आकर्षक दिसते. पण कधी काळी हीच एकता कपूर अतिशय जाड असल्याने ट्रोल व्हायची. एका मुलाखतीदरम्यान ती म्हणालीही होती की लहानपणी मी नेहमीच अभिषेक बच्चन, बॉबी देओल अशा फिट लोकांसोबत रहायचे, पण तरीही मला माझ्या जाड असण्याचा कधीच कॉम्प्लेक्स नव्हता..5 / 9५. एकता कपूर अतिशय श्रद्धाळू आहे. अंकशास्त्रावर तर तिचा गाढ विश्वास. त्यामुळे तिचं कोणतंच काम ती अंकशास्त्र बघितल्याशिवाय करत नाही.. पायातल्या चपलांपासून ते ड्रेसच्या रंगापर्यंत सगळं काही ती अंकशास्त्रानुसार करते...आणि म्हणूनच तिच्या हातात नेहमीच वेगवेगळे दोरे आणि हातात अनेक अंगठ्या दिसतात. 6 / 9६. एकता कपूर इतरांच्या पार्ट्यांमध्ये फार कधी दिसत नाही. त्यामुळे तिला पार्टी आवडत नसाव्यात असं वाटत असलं तरी ते साफ चुकीचं आहे. एकता खूप चांगली पार्टी होस्ट असून ती जेव्हा पार्टी थ्रो करते तेव्हा ती पार्टी अतिशय खास असते, असं तिच्या जवळच्या मित्रमंडळींचं म्हणणं आहे.7 / 9७. कुणी काही सांगतंय म्हणून आपण ते करायचं, हे तत्व तिला कधीच मान्य नाही.. आपल्याला जे वाटतंय ते करू, नाही जमलं तर पडू, धडपडू पण त्यातूनही मार्ग काढून जे करायचं आहे ते करून दाखवूच हा तिचा जीवन जगण्याचा फंडा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.8 / 9८. एकता कपूरही पेट लव्हर आहे. तिला कुत्रे विशेष आवडतात. पण प्रेम करण्याची तिची स्टाईलही वेगळी आहे. एकता तिच्या घराजवळच्या, ऑफिसजवळच्या बऱ्याच स्ट्रिट डॉगला नेहमी खाऊ घालते. ती नसेल तर तिच्या माघारीही तिच्या या लाडक्या कुत्र्यांना कुणी ना कुणी खाऊ घालतंच.9 / 9९. एकता आणि तिचा भाऊ तुषार कपूर या दोघांनीही लग्न केलेलं नाही. तुषार कपूरप्रमाणेच एकता कपूरनेही २०१९ साली रवी या मुलाला सरोगसीद्वारे जन्म दिला आणि ती सिंगल पॅरेंट झाली.