शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढाफुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या-सुंदर-सुबक डिजाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:44 IST

1 / 8
अनेकदा रांगोळ्या (Diwali 2025) काढायला आपल्यावेळ नसतो अशावेळी फुलांची रंगोळी काढून तुम्ही सुंदर सजावट करू शकता.रांगोळीसाठी झेंडू, गुलाब, शेंवती, यांसारख्या सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांची निवड करा.
2 / 8
रांगोळी काढण्यापूर्वी सर्व फुलांच्या पाकळ्या व्यवस्थित वेगळ्या करून घ्या. देठ किंवा खराब झालेले भाग काढून टाका.
3 / 8
गोल, चौकोनी, कमळ किंवा स्वास्तिक किंवा ओम यांसारखे सोपे भूमितीचे आकार निवडा कारण फुलांनी ते भरणं सोपं जातं.
4 / 8
रांगोळीचे मुख्य डिजाईन आधी खडूनं किंवा रांगोळीच्या पांढऱ्या रंगानं काढून घ्या. ज्यामुळे फुलांची रांगोळी व्यवस्थित आकारात येते.
5 / 8
फुलांच्या रंगांचा योग्य मेळ साधा. उदा. मध्यभागी पिवळा झेंडू, त्याला बाहेरून लाल गुलाबाची सीमा आणि त्यानंतर पांढरी शेवंती वापरा. कॉन्ट्रास्ट रंगामुळे रांगोळी अधिक उठून दिसेल.
6 / 8
पाकळ्या एकावर एक किंवा एका थरात व्यवस्थित दाबून ठेवा जेणेकरून त्या वाऱ्यानं उडून जाणार नाहीत आणि रांगोळीला छान टेक्स्चर मिळेल.
7 / 8
हिरव्यागार पानांच्या डिजाईन्समध्ये आंब्याची पानं किंवा अशोकाची पानं लहान आतील भागासाठी वापरा यामुळे रांगोळीला नैसर्गिक लूक येतो.
8 / 8
रांगोळीच्या मध्यभागी दिवा, पणती, कलश किंवा गणपतीची मूर्ती ठेवा. रांगोळी पूर्ण झाल्यावर फुलांवर हलकं पाणी शिंपडा. यामुळे फुलं ताजी राहतात आणि रांगोळी अधिक चांगली राहते. रांगोळीच्या कडांभोवती लगान तेलाच्या पणत्या किंवा टि लाईट कँडल्स ठेवून दिवाळीचा लूक आकर्षक बनवू शकता.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५rangoliरांगोळीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणDiwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीSocial Mediaसोशल मीडिया