शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरणपोळी तयार करता? पुरणपोळीची कहाणी घरोघरची रीत न्यारी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2025 21:26 IST

1 / 11
आपले पारंपारिक महाराष्ट्रीय पदार्थ चवीला फारच सुरेख असतात. त्यात आपले गोड पदार्थ म्हणजे वाहह!!! मज्जाच येते. या पदार्थांबद्दल विचार करूनही तोंडाला पाणी सुटेल.
2 / 11
पण एक मात्र खरं आहे की, हे पदार्थ जेवढे चवीला छान असतात, तेवढेच तयार करायलाही किचकट असतात. मनावर व डोक्यावर फार संयम ठेऊन काम करावे लागते. झटपट झाले असे होत नाही. जसे की पुरणपोळी.
3 / 11
घरोघरी पुरणपोळी तयार केली जात असली तरी, तयार करण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात.
4 / 11
काही म्हणतात पुरणपोळी फुलली म्हणजे छान झाली. तर काही म्हणतात फुलली म्हणजे पुरण चुकलं. प्रत्येकाच्या मान्यता वेगवेगळ्या.
5 / 11
खानदेशी पद्धतीत पातळ पिवळ्या दिसणाऱ्या मोठ्या आकाराच्या पुरणपोळ्या तयार करून उलट्या कढईवर भाजल्या जातात.
6 / 11
अनेक ठिकाणी लाटी वर पुरण ठेवतात, वरतून आणखी एक लाटी ठेवतात आणि मग पोळी लाटतात.
7 / 11
काही ठिकाणी पुरणामध्ये नारळ घालण्याची पद्धत आहे. पोळीची चवही जरा वेगळी लागते.
8 / 11
बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचे पीठ मळताना मैदा वापरला जातो. पीठ अगदी मऊ आणि चिकट तयार केले जाते. मग तांदळाच्या पीठाच्या मदतीने पोळी लाटली जाते.
9 / 11
काही जण साध्या पोळीसाठी आपण जशी कणीक भिजवतो, तशीच कणीक भिजवतात. त्यात पुरण भरून मग पोळी लाटतात.
10 / 11
काही जण साध्या पोळीसाठी आपण जशी कणीक भिजवतो, तशीच कणीक भिजवतात. त्यात पुरण भरून मग पोळी लाटतात.
11 / 11
त्यामुळे प्रत्येक घरची पुरणपोळी चवीला वेगळीच लागते. कुठली पारंपारिक आणि कुठली मिलावटी हा प्रश्नच उद्भवत नाही. कारण भारतीय पाककला विविधतेने परिपूर्ण आहे.
टॅग्स :foodअन्नMaharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिकRecipeपाककृतीHoliहोळी 2025