1 / 6चेहरा काळवंडला की आपल्याला वाटतं त्वचा टॅन झाली आहे. त्यामुळे मग आपण फेशियल, क्लिनअप किंवा इतर काही घरगुती उपाय करतो.2 / 6पण तरीची चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी झालेला आहे, असं जाणवत नाही. याचं कारण म्हणजे तुम्हाला फेशियल, क्लिनअपसारख्या वरवरच्या उपायांची गरज नसून तुमच्या शरीराला आतून पोषण मिळण्याची गरज आहे.3 / 6जर आपल्या आहारात काही पौष्टिक घटकांची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो आणि त्वचेचा रंग, पोत बिघडत जातो.4 / 6त्यापैकी एक आहे व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी १२. व्हिटॅमिन ई त्वचेसाठी अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे बदाम, अक्रोड, जवस असे व्हिटॅमिन ई देणारे पदार्थ नियमितपणे खा.5 / 6त्याचबरोबर व्हिटॅमिन सी देखील तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात असायला हवं. त्यामुळेही त्वचा चमकदार, तरुण राहण्यास कदत होते.6 / 6याशिवाय लोह, प्रोटीन्स हे घटकही तुमच्या आहारात असायला हवे. कारण त्यांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो आणि तो लगेचच आपल्या त्वचेवर दिसू लागतो. चेहरा काळवंडून मलूल झाल्यासारखा भासतो.