शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हाडं दणकट ठेवणारे ६ पदार्थ, मिळते भरपूर कॅल्शियम! दूध आवडत नाही-पचत नाही-नो टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 19:55 IST

1 / 8
हाडांच्या मजबुतीसाठी शरीरात कॅल्शियम योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी दूध पिणे हा अतिशय उत्तम उपाय आहे.
2 / 8
पण काही जणांना दूध अजिबात आवडत नाही. त्यात लहान मुलं तर दूध प्यायला खूप त्रास देतात. त्यामुळेच त्यांची हाडं मजबूत कशी होणार असं वाटून त्यांना बळजबरीने दूध पिऊ घालत असाल तर थांबा आणि पुढे सांगितलेले काही शाकाहारी पदार्थ खाऊ घाला. कारण त्या पदार्थांमधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते.
3 / 8
सगळ्यात पहिला पदार्थ आहे तीळ. १०० ग्रॅम तिळामधून ९७५ मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. दररोज एक चमचा तीळ खाल्ले तर शरीरातली कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते.
4 / 8
हिरव्या पालेभाज्याही कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यापैकी सगळ्यात जास्त कॅल्शियम देणारी पालेभाजी म्हणजे पालक.
5 / 8
बदाम हा प्रोटीन्सचा आणि व्हिटॅमिन ई चा एक उत्तम स्त्रोत आहे. पण त्यातून कॅल्शियमही चांगल्या प्रमाणात मिळते. रोज सकाळी भिजवलेले बदाम नियमितपणे खाल्ल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळू शकते.
6 / 8
अनेक डॉक्टरांच्या मते अंजीर हे खऱ्या अर्थाने एक सुपरफूड आहे. अंजीरमधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. तुम्ही जर २ अंजीर खाल्ले तर त्यातून जवळपास ६५ मिलीग्रॅम कॅल्शियम मिळू शकते.
7 / 8
सोया मिल्क, सोया चंक्स यातूनही कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते. त्यातून अधूनमधून हे पदार्थही तुमच्या आहारात असू द्या.
8 / 8
त्याचप्रमाणे चिया सीड्स हा देखील कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून नियमितपणे चिया सीड्स खावेत.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmilkदूधkidsलहान मुलंfoodअन्न