शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उर्वशी रौतेला आणि रिषभ पंतचं नेमकं भांडण काय, बिनसलं कुठं? कोण आहे उर्वशी रौतेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2022 17:49 IST

1 / 8
१. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर रिषभ पंत यांच्यातला वाद आता चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. सध्या सोशल मिडियावर या दोघांच्याही भांडणाची जोरदार चर्चा असून त्यावर वेगवेगळे विनोदी मिम्सही आले आहेत.
2 / 8
२. उर्वशी अभिनयापेक्षा इतर गोष्टींमुळेच नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांची चर्चा होते तर कधी तिच्या बोलण्याची. आता असंच तिची आणि रिषभच्या भांडणाची चर्चा सुरू आहे. त्यांचा हा वाद सध्या इन्स्टा वाद म्हणून ओळखला जात आहे. कारण ते दोघेही इन्स्टाग्रामचा वापर करून एकमेकांना प्रतिउत्तर देत आहेत.
3 / 8
३. २०१८ पासून उर्वशी आणि रिषभ यांची नावं एकमेकांशी जोडली गेली आहेत. रिषभच्या वाढदिवसाला उर्वशीने त्याला इन्स्टाग्रामवरून शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून त्या दोघांची चर्चा सुरु झाली.
4 / 8
४. उर्वशी रिषभ पंत याचा उल्लेख आरपी अशा नावाने करते. काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीत ती म्हणाली की शुटिंगसाठी ती बाहेरगावी गेली असता आरपी तिच्या हॉटेलच्या लाॅबीमध्ये आला आणि त्याने तिची तब्बल १० तास वाट पाहिली.
5 / 8
५. यावर रिषभने पलटवार केला असून उर्वशीने सांगितलेली ही सगळी माहिती खोटी असून आजकाल लोकं थोड्याशा प्रसिद्धीसाठी काहीही खोटं सांगतात, असं तो म्हणाला.
6 / 8
६. त्याचं हे उत्तर ऐकून उर्वशी पुन्हा बिथरली आणि 'छोटू भैया को बैट-बॉल खेलना चाहिए, मैं मुन्नी नहीं हूं, जो बच्चों के लिए बदनाम हो जाए' अशी कमेंट तिने टाकली. शिवाय 'रक्षाबंधन मुबारक हो' असं म्हणत तिने रिषभला राखीपौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या. त्यासाठी तिने आरपी छोटू भैया असा हॅशटॅग वापरला. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
7 / 8
७. 'लोग नाम और फेम के भूखे हैं, भगवान उनका भला करें' असं म्हणत रिषभने तिला प्रत्युत्तर दिलं. शिवाय 'मेरा पीछा छोड़ो बहन' अशी वेगळी इन्स्टापोस्टही त्याने हॅशटॅग उर्वशी लावून पोस्ट केली होती. पण नंतर काही तासांतच त्याने ती डिलिटही केली. पण तोपर्यंत अनेक जणांनी त्याच्या या पोस्टचे स्क्रिन शॉट काढून ठेवले होते.
8 / 8
८. या वादात आता आणखी काय काय संवाद ऐकायला मिळतात आणि विनोद निर्मिती होते, याची प्रतिक्षा आता त्यांचे चाहते करत आहेत.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपurvashi rautelaउर्वशी रौतेलाRishabh Pantरिषभ पंतInstagramइन्स्टाग्राम