शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सोनपापडी, विकतच्या मिठाईला करा बाय! दिवाळीत मित्रमंडळींना द्या 'हे' गोड पदार्थ, आवडीने फस्त करतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2025 16:44 IST

1 / 7
दिवाळीच्या दिवसांमध्ये नातेवाईक, मित्रमंडळी यांना हौशीने गोड पदार्थ दिले जातात. त्यातही सोनपापडी हा सर्वाधिक दिला जाणारा पदार्थ. पण दिवाळीच्या दिवसांत हे गोड पदार्थ घरात एवढे जास्त येतात की ते खाण्याचाही कंटाळा येतो.(Diwali gift ideas)
2 / 7
शिवाय दिवाळीच्या दिवसांमध्ये पेढे, खवा यांच्यातली भेसळही वाढलेली असते. म्हणूनच या दिवसांमध्ये साेनपापडी किंवा विकतची मिठाई एकमेकांना देण्यापेक्षा पुढे सांगितलेल्या काही पदार्थांचा निश्चितच विचार करून पाहा.. (best Diwali sweets options for friends and relatives)
3 / 7
घरी तयार केलेले खजुराचे लाडू हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. खजूर मॅश करून घ्या. त्यात ड्रायफ्रुटचे बारीक तुकडे आणि तूप घालून त्याचे हवे त्या आकाराचे लाडू करा.
4 / 7
मिल्क पावडर विकत आणा. मिल्कपावडरमध्ये दूध, तूप घालून ती आटवून घ्या. सगळ्यात शेवटी त्यात साखर घाला. घरच्याघरी मिल्क पावडरचे खूप चवदार पेढे तयार करता येतात.
5 / 7
नुसता सुकामेवा जरी एकमेकांना दिला तरी चालतो. कारण सुकामेव्यासारखे पदार्थ कितीही जास्त झाले तरी ते वाया जात नाहीत. लोक ते पुरवून पुरवून खातात.
6 / 7
डार्क चॉकलेट देखील एकमेकांना देऊ शकता. साधं चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ देण्यापेक्षा डार्क चॉकलेट नक्कीच चांगला पर्याय आहे.
7 / 7
जे लोक खूप जास्त डाएट कॉन्शस आहेत त्यांना प्रोटीन बार देण्याचाही विचार करू शकता. हे गिफ्टही हेल्थ फ्रिक लोक आवडीने खातील. वाया जाऊ देणार नाहीत किंवा दुसऱ्यांना देऊनही टाकणार नाहीत.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५foodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सGift Ideasगिफ्ट आयडिया