शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

khandeshi food : या जेवाले! झणझणीत खान्देशी पदार्थांची चमचमीत मेजवानी! लै भारी पदार्थांची पाहा झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 16:53 IST

1 / 11
खान्देशातली शेवभाजी, वरण बट्टी नाही खाली तर काय मजा! महाराष्ट्रातील प्रत्येक भागात वेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात. सगळेच पारंपारिक पदार्थ जबरदस्त असतात. कोकण, विदर्भ, मराठवाडा, देशावर सगळीकडेच मस्त पदार्थ केले जातात. मात्र खान्देशी पदार्थांची मज्जा काही वेगळीच आहे.
2 / 11
पारंपरिक खान्देशी पदार्थ अगदी झणझणीत आणि चमचमीत असतातमसाले चवीला वेगळे असतात. फोडणीचा ठसका लागायलाच हवा. अर्थात तिखटाचा त्रास होऊ नये याची सोयही या पाककृतीमध्ये आहे. तुपाची धार आणि लिंबाचा रस वापरून अन्न बाधणार नाही याची काळजी घेतली जाते.
3 / 11
खिचडीला मिळमिळीत पदार्थ समजणाऱ्यांनी एकदा खान्देशी मसाला खिचडी नक्की खाऊन पाहायला हवी. तांदूळ, डाळ, भाज्या , मसाले आणि खास खान्देशी मसाला घालून केलेल्या या खिचडीला तोडच नाही.
4 / 11
पातोडीची आमटी आजकाल फार लोकप्रिय आहे. झणझणीत असा लालचुटूक रस्सा केला जातो. बेसनाच्या पीठाची वाफवलेली वडी झणझणीत रस्स्यात टाकायची आणि मस्त भाकरीसोबत खायची.
5 / 11
कारळ्याची चटणी महाराष्ट्रात सगळीकडे केली जाते. याच चटणीला जरा हटके टच देऊन मसालेदार खुरासणीची चटणी केली जाते. लसूण, लाल मिरची, कारळ्याच्या बिया असे पदार्थ वापरुन ही झणझणीत चटणी केली जाते. पोळी, भाकरी, भात सगळ्यासोबत मस्त लागते. वर तेलाची धार सोडायची आणि खायची.
6 / 11
डुबुक वडे तर अफाट चवीचे. कांद्याचे वाटण तयार करुन त्याचा चमचमीत रस्सा तयार करायचा. बेसनाचे पीठ मसाले घालून जरा घट्ट तयार करायचे आणि लहान लहान वडे रस्स्यात सोडायचे. रस्स्यात उकळायचे आणि मग तो रस्सा भात किंवा भाकरी सोबत खायचा.
7 / 11
शेव भाजी हा पदार्थ हॉटेलच्या किंवा ढाब्याच्या मेन्यूमध्ये कायम असतोच शेव भाजी महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. करायला सोपी आणि डोळ्यातून पाणी काढणारी ही रेसिपी टोमॅटो, कांदा, लसणाचा रस्सा आणि जाड शेव.
8 / 11
वरण बट्टी नाश्त्यासाठी , जेवणासाठी एकदम मस्त. कणकेच्या खुसखुशीत बट्ट्या आणि साधे तुरीच्या डाळीचे वरण एकत्र करुन त्यावर मस्त तुपाची धार सोडायची आहाहाहा!! साधा मात्र एकदम मनाला समाधान देणारा असा हा पदार्थ आहे.
9 / 11
वांग्याचे भरीत हा पदार्थ महाराष्ट्रात सगळीकडे केला जातो. पद्धत मात्र वेगवेगळी असते. वांग्याचे मिरचीचा ठेचा, कांदा, तेल फोडणी घालून केलेले खान्देशी भरीत फार प्रसिद्ध आहे. तसंच वांग्याची घोटलेली भाजीही लागते भारी.
10 / 11
चुका तसेच पालकाची भाजी, कच्चा टोमॅटो, कोथिंबीर, तूर डाळ आदी पदार्थांच्या मिश्रणातून जबरदस्त असा डाळीचा प्रकार केला जातो. ज्याला डाळ गंडोरी असे म्हटले जाते. रंगाला मस्त हिरवा दिसणारा हा पदार्थ एकदम भारी लागतो.
11 / 11
एवढे तिखट पदार्थ झाले अब कुछ मिठा हो जाये! सांजोरी हा एक मस्त मऊ आणि गोड पदार्थ आहे. रवा, गूळ, खोबरं, खसखस, सुकामेवा आदी पदार्थांच्या मिश्रणातून तयार होणारी सांजोरी मस्त खुसखुशीत असते.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Maharashtraमहाराष्ट्र