शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चविष्ट आणि कुरकुरीत चिवड्याचे ६ प्रकार - पोटभरीचा खाऊ, लहान ते मोठे सगळ्यांनाच आवडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2025 14:40 IST

1 / 8
महाराष्ट्रात घरोघरी चिवड्याचे डबे भरलेले असतात. फक्त दिवाळीतच नाही तर इतरही दिवशी चिवडा आवडीने खाल्ला जातो. संध्याकाळी खाऊ म्हणून तसेच जेवताना तोंडी लावायला चिवडा घेता येतो.
2 / 8
चिवड्यातही अनेक प्रकार असतात. सगळे घरी करता येण्यासारखे आहेत. फार सोप्या रेसिपी आहेत. नक्की करुन पाहा. सगळे प्रकार चवीला एकदम वेगळे असतात.
3 / 8
पोह्यांचा चिवडा फार लोकप्रिय प्रकार आहे. कोकणात सकाळी नाश्त्यासाठीही कांदा, नारळ, टोमॅटो घातलेली चिवडा खातात. जाड पोह्यांचा आणि पातळ पोह्याचाही चिवडा करता येतो. एकदा खायला लागल्यावर भानच राहत नाही.
4 / 8
उपासाला चालणारा बटाटा चिवडाही विविध प्रकारचा असतो. उपासाच्या दिवशी हा चिवडा घरोघरी आवडीने खाल्ला जातो. तसेच बटाट्याचा तिखट चिवडाही मिळतो. गोड बटाटा चिवडाही असतो. त्यात काजू, मनुका आदी अनेक पदार्थ असतात.
5 / 8
मुरमुर्‍यांच्या चिवड्याला भडगं असेही म्हटले जाते. हा चिवडा मस्त चमचमीत आणि तिखट असतो. तसेच त्यात कमी तिखट आणि लसणाचा चिवडाही मिळतो.
6 / 8
ज्वारीच्या दाण्यांचा चिवडा करता येतो. त्यासाठी खास ज्वारीच्या लाह्या मिळतात. त्याचा वापर करा. मस्त फोडणी तयार करुन त्यात या लाह्या परता पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ आहे.
7 / 8
अगदी साधा आणि आरामात उपलब्ध होणारा चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा. गोड चिवडा तिखट चिवडा आणि प्लेन चिवडा असे विविध प्रकार या चिवड्यात आहेत. एकदम कुरकुरीत असा हा चिवडा असतो.
8 / 8
साबुदाण्याचा चिवडा कधी खाल्ला का ? मस्त कुरकुरीत आणि हलका असा हा चिवडा उपासालाही चालतो. शेंगदाणे, हिरवी मिरची असे पदार्थ घालून केला जातो. फार चविष्ट असतो.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स