शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ऐन तारुण्यात हाडांची कुरकुर? भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ खा, हाडं बळकट होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 16:35 IST

1 / 8
हल्ली कमी वयातच अनेकांचे गुडघे दुखू लागले आहेत. पुर्वी गुडघे दुखायला लागले की त्या व्यक्तीचं वय झालं असं समजलं जायचं. पण आता मात्र अगदी तिशी- पस्तिशीतले लोक गुडघेदुखीची तक्रार करतात.
2 / 8
याशिवाय बैठ्या कामाचे वाढलेले प्रमाण, दुचाकी- चारचाकीचा वाढलेला वापर यामुळे मग कमी वयातच मान, पाठ, कंबरदुखीही मागे लागत आहे.
3 / 8
आहारात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम नसेल तर हा त्रास हाेतो. शिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायूही दुखतात. त्यामुळे आपल्या आहारात कोणते कॅल्शियमयुक्त पदार्थ असायला हवे, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ आयुर्वेदिक डॉक्टरांनी healyourselfwith_manasikrishna या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
4 / 8
यामध्ये त्यांनी भरपूर कॅल्शियम देणारा पहिला पदार्थ जो सांगितला आहे तो म्हणजे नाचणी. नाचणीच्या वेगवेगळ्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा. कारण त्यातून चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळते.
5 / 8
तीळ फक्त संक्रांतीच्या काळापुरतेच मर्यादित ठेवू नका. रोज एक चमचा तीळ खा. किंवा चटणीच्या माध्यमातून रोज तीळ खा.
6 / 8
भरपूर कॅल्शियम देणारा आणखी एक पदार्थ म्हणजे राजगिरा. पण आपण तो पदार्थ उपवासापुरताच मर्यादित ठेवतो. पण उपवासाशिवाय अन्य दिवशीही राजगिरा खायला हवा.
7 / 8
कुळीथमधूनही चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे आठवड्यातून एकदा- दोनदा तुमच्या आहारात कुळीथ असायला हवे.
8 / 8
खाण्याचा चुना हा देखील कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. घरी केलेले विड्याचे पान तुम्ही खाल्ले तर निश्चितच त्या माध्यमातून थोडासा चुना पोटात जातो. याशिवाय चुना आणि मध हे दोन पदार्थ एकत्र करून दुखणाऱ्या भागाला लावले तर वेदना कमी होण्यास मदत होते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न