शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमी तेल पिणाऱ्या टमटमीत पुऱ्या करण्याच्या ५ ट्रिक्स; चेंडूसारखी टम्म फुगेल पूरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:09 IST

1 / 7
सणवार म्हटलं की पुरी (Cooking Hacks) हा पदार्थ घराघरांत बनवला जातो. पुरी टम्म फुगावी, कमी तेलकट व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा पुऱ्या खायलाही चांगल्या लागतात यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Make Puri Less Oily Or fluffy)
2 / 7
पुरीसाठी घट्ट कणीक असावी. कारण कणीक मऊ असेल तर पुरी तेल शोषून घेते. कणकेत गरम तेलाचे मोहन घाला ज्यामुळे पुरी खुसखुशीत होते. कमी तेलकट होते.
3 / 7
पुरी लाटताना पिठाचा वापर करण्याऐवजी थोडं तेल लावा. त्यामुळे कढईतलं तेल खराब होत नाही. पुऱ्या स्वच्छ दिसतात. मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटा.
4 / 7
पुरी तळण्यासाठी तेल खूप चांगले गरम होऊ द्या. तेल पुरेसे गरम झाले नसेल तर पुरी फुगत नाही आणि जास्त तेल शोषून घेते. पुरी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळा. एकावेळी कढईत जास्त पुऱ्या घालू नका.
5 / 7
पुरी तळल्यानंतर लगेचच जाळीच्या प्लेटवर किंवा टिश्यू पेपरवर ठेवा ज्यामुळे जास्तीचे तेल निघून जाते.
6 / 7
पुरी तळण्यासाठी तुम्ही शेंगदाणा तेल, राईस ब्रान ऑईल किंवा सुर्यफुलाचे तेल वापरू शकता.
7 / 7
गव्हाच्या पिठात मैदा किंवा रवा घातल्यास पुरी अधिकच रूचकर, कुरकुरीत होते.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स