शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता आहे असं सांगणारी ५ प्रमुख लक्षणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2025 09:10 IST

1 / 6
बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता असते. आपले शरीर त्या संदर्भात आपल्याला सूचनाही देत असते. पण आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ती लक्षणं नेमकी कोणती ते पाहा.. याबाबत डॉ. सांगवान आणि डॉ. ग्रीनी यांनी दिलेली माहिती gq.com यांनी प्रकाशित केली आहे.
2 / 6
बऱ्याचदा डोकं बधीर झाल्यासारखं होतं, अजिबातच काही सूचत नाही, काय निर्णय घ्यावा हे कळत नाही. असं वारंवार तुमच्या बाबतीत होत असेल आणि साध्यासाध्या गोष्टीतही काय करावं सुचत नसेल तर हे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचं एक लक्षण असू शकतं.
3 / 6
जॉईंट पेन हे तर शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता सांगणारं एक प्रमुख लक्षण आहे.
4 / 6
शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर त्याचा परिणाम मेंदूतील सेरोटॉनिन सिंथेसिस या क्रियेवर होतो. त्यामुळे डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो.
5 / 6
सुर्यप्रकाशातून जर पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळालं नाही तर शरीरामध्ये मेलॅटोनिन हे हार्मोन कमी प्रमाणात स्त्रवले जाते. या हार्मोन्सचा परिणाम झोपेवर होतो. त्यामुळे ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी असते, त्यांची झोप खूप कमी होते.
6 / 6
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते. त्याचा परिणाम म्हणजे त्या लोकांना वारंवार सर्दी, खोकला, फ्लू असा त्रास होतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स